घरदेश-विदेशजम्मू काश्मीरः शोपियानमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरः शोपियानमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

शोपियान जिल्ह्यात गेल्या २४ तासांत लष्कर आणि अतिरेकी यांच्यातील ही दुसरी चकमक आहे.

जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील पिंजोरा भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियानच्या पिंजोरा भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने या भागात घेराव व शोध मोहिम राबविली. याबाबतची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितली. शोपियान जिल्ह्यात गेल्या २४ तासांत लष्कर आणि अतिरेकी यांच्यातील ही दुसरी चकमक आहे.

- Advertisement -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांची नावे उमर धोबी, पिंजोरा येथील रहिवासी, रईस खान, वेहीलचा रहिवासी, सकलन अमीन, रेबन येथील रहिवासी, आणि वकील अहमद, राकपोरा कापरण येथील रहिवासी आहेत. शोपियान जिल्ह्यातील रेबन भागात रविवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा स्वयंघोषित कमांडरसह पाच अतिरेकी ठार झाले. नऊ तासांच्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून तीन एके-४७ रायफल, दोन पिस्तूल आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.


हेही वाचा – तुम्हाला चिनी वस्तूंशिवाय पर्यायच नाही; चीनने भारताला चिथवलं

- Advertisement -

कश्मीरच्या खोऱ्यात अशांतता निर्माण होण्यासाठी पाकिस्तान सतत दुष्कर्म करत आहे. पाकिस्तानने ३ जूनच्या रात्री अशीच दुष्कृत्ये केली. उत्तर-काश्मीरच्या नौगम सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी हुसकावून लावलं. उत्तर काश्मीरमध्ये दहशतवादी घुसखोरी करण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी कव्हर फायरही देत ​​आहे.

घुसखोरी उधळून लावली

उत्तर काश्मीरमधील नौगम सेक्टरमधून नियंत्रण रेषेत घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न सैन्याने रविवारी उधळून लावला. जवाबी कारवाईनंतर दहशतवाद्यांनी पीओकेला पळ काढली. पळत असताना दहशतवाद्यांनी घाबरून बॅग व शिडी सोडली. पिशवीत अन्न, कपडे आदी सामान होतं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -