घरदेश-विदेशदिल्लीची दंगल हा कट

दिल्लीची दंगल हा कट

Subscribe

गृहमंत्री अमित शहा यांची लोकसभेत माहिती

सीएएवरून ईशान्य दिल्लीत उसळलेली दंगल हा पूर्वनियोजित कट होता. ही दंगल भडकवणार्‍यांना शोधून काढू, मग ते कोणत्याही जाती, धर्माचे किंवा राजकीय पक्षाचे असोत, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दंगल पीडितांना दिला. त्याचवेळी ’घर के बाहर निकलो, यह आर पार की लढाई है’ हे नारे चिथावणीखोर नाहीत का, असा सवाल करत ही नारेबाजी विरोधकांनीच केली, असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला.

दिल्ली दंगलीवर लोकसभेत बुधवारी चर्चा झाली. या चर्चेला अमित शहा यांनी उत्तर दिले. दंगल प्रकरणी कारवाई करताना कुठल्याही निष्पापावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी आतापर्यंत ४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १५३ शस्त्र जप्त केली गेली आहेत. २२ फेब्रुवारी रोजी सोशल मिडियावर ६० अकाऊंट तयार करण्यात आले. हे अकाऊंट २७ फेब्रुवारी रोजी बंद करण्यात आले.

- Advertisement -

हे अकाऊंट चिथावणी देण्यासाठी तयार करण्यात आले होते. त्यामागे कोण आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत, असे अमित शहा म्हणाले. सीएएवरून ईशान्य दिल्लीत दंगली उसळली. काही तासांत या दंगलीचे लोण पसरले. एवढ्या कमी वेळात कुठल्याही कटाशिवाय दंगल उसळू शकत नाही. यामुळे ईशान्य दिल्लीतील दंगल प्रकरणी कटकारस्थान रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दिशेने तपास सुरू असल्याचं अमित शहा यांनी सांगितले. तसंच शांतता प्रस्थापित करण्यासाठी २५ फेब्रुवारीपासून ६५० बैठका घेण्यात आल्या आहेत. दिल्ली दंगल प्रकरणी एकूण २, ६४७ जणांना ताब्यात घेण्यात आलं. त्यापैकी काहींना अटकही केली गेली. २७ फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत ७०० एफआयआर दाखल झाल्या आहेत, अशी माहिती अमित शहा यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -