घरदेश-विदेशकाँग्रेसचे भूत वारंवार 'त्यांच्या' मानगुटीवर बसते..., संजय राऊत यांचा मोदींवर हल्लाबोल

काँग्रेसचे भूत वारंवार ‘त्यांच्या’ मानगुटीवर बसते…, संजय राऊत यांचा मोदींवर हल्लाबोल

Subscribe

मुंबई : निवडणुका असलेल्या देशातील पाच राज्यांत भाजपाची स्थिती बरी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12 वर्षांपासून ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देत आहेत, पण त्याच काँग्रेसचे भूत वारंवार त्यांच्या मानगुटीवर बसते. त्यामुळे बेजार झालेला भाजपा आणि नरेंद्र मोदी पाच राज्यांत सर्व प्रकारचे जंतर मंतर करताना दिसत आहेत, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा – पाच राज्यांतील निवडणुकांचे निकालही असेच लागतील काय? संजय राऊतांनी भाजपाला डिवचले

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी मोदी-शहा यांच्यासमोर आव्हान उभे केले, तेव्हा मोदी यांनी ‘गांधीं’ना शह देण्यासाठी ‘ईडी’ला मैदानात उतरवले. काँग्रेस आणि गांधी परिवाराची मालकी असलेल्या ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राची साधारण सहाशे कोटी रुपयांची मालमत्ता ‘ईडी’ने जप्त केली. हे आश्चर्यच आहे. हे असे केल्याने विधानसभा निवडणुकांत जय मिळेल असे त्यांचे ‘व्यापारी’ डोके आहे, अशी टीकाही खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या ‘रोखठोक’ सदरातून केली आहे.

भाजपात अंधभक्तांचे पीक आले आहे, पण ही अंधभक्ती देशाला मारक आहे. मोदी यांना आमचा पाठिंबा हिंदुत्वासाठी आहे, असे सांगणारे पांढरपेशे लोक भेटतात तेव्हा आश्चर्य वाटते. जाती-धर्मातली तेढ, लोकशाहीचे पतन, एकाच उद्योगपतींचे धन वाढवणे यास हिंदुत्व मानणारे देशाचे शत्रू आहेत. धर्म म्हणजे काय ते या लोकांना समजले नाही व अंधभक्त सांगतील तो ‘धर्म’ असे आता सुरू आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठरलं! भाजपा 26 तर, शिंदे आणि ठाकरे गटाला 22 जागा; फडणवीसांनी सांगितला लोकसभेचा फॉर्म्युला

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल मोदींच्या बाजूनेच लागतील याची गॅरेंटी नाही, कारण काँग्रेस पक्ष अद्यापि संपलेला नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली त्या पक्षाची झेप सुरू आहे. ज्या ‘काँग्रेसमुक्त भारता’चा नारा नरेंद्र मोदी यांनी दिला त्या मोदींची लढाई काँग्रेस पक्षाबरोबरच आहे व पाच राज्यांत मोदींसमोर काँग्रेसचेच आव्हान आहे, याकडे खासदार राऊत यांनी लक्ष वेधले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -