घरताज्या घडामोडीबाळासाहेबांच्या विचारांविरोधात जाऊन वारसांनी काम केले, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

बाळासाहेबांच्या विचारांविरोधात जाऊन वारसांनी काम केले, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Subscribe

'बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना दूर ठेवले त्याच्यासोबत गेले. वडिलांच्या विचारा विरोधात जाऊन काम केले. सत्ता स्थापन केली', अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच, 'हिंदुत्व, हिंदू धर्म एक जीवन प्रणाली आहे.

‘बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना दूर ठेवले त्याच्यासोबत गेले. वडिलांच्या विचारा विरोधात जाऊन काम केले. सत्ता स्थापन केली’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच, ‘हिंदुत्व, हिंदू धर्म एक जीवन प्रणाली आहे. आपले हिंदुत्व इतर धर्मावर अन्याय करणारे नाही. काही लोकांना वाटत आहे कि हिंदुत्व प्रत्येक घरी पोचले तर आपले दुकान बंद होईल’, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. (The heirs worked against Balasaheb views Chief Minister Shinde criticism of Uddhav Thackeray)

“काही लोकांना एलर्जी आणि दुःख होत आहे. पण हा दौरा राजकीय नाही आहे. आमची आस्था असून हा धार्मिक दौरा आहे. याठिकाणी आम्ही विकास पाहत आहोत त्याबद्दल योगींचें धन्यवाद. हिंदुत्व, हिंदू धर्म एक जीवन प्रणाली आहे. आपले हिंदुत्व इतर धर्मावर अन्याय करणारे नाही. काही लोकांना वाटत आहे कि हिंदुत्व प्रत्येक घरी पोचले तर आपले दुकान बंद होईल. यासाठी स्वातंत्र्य मिळाल्यावर हिंदुत्वाचा मुद्दा मागे पडला होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावर ‘गर्व से काहो हम हिंदू है’ असा नारा दिला”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

“2019 मध्ये शिवसेना भाजपाची सत्ता येईल असे लोकांना वाटत होते. पण खुर्चीच्या लालसेपोटी सत्ता दुसऱ्यासोबत केली. पण आता आम्ही 9 महिन्यापूर्वी सर्व नीट केले आहे. आम्ही दोघे विचारधारा घेऊन अयोध्येला आलो आहोत. ते पहिला बोलायच ‘पहिले मंदिर नंतर सरकार’. बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना दूर ठेवले त्याच्यासोबत गेले. वडिलांच्या विचारा विरोधात जाऊन काम केले. सत्ता स्थापन केली. ज्यांच्या मंदिराला विरोध होता. मोदींनी आता मंदिरसुद्धा तयार केले आहे आणि तारीख पण सांगितली आहे”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

“मागील 9 महिन्यात जे निर्णय घेतले ते कधीच नाही घेतले. आमचं सरकार गरीब लोक शेतकरी विध्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांचे आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करण्याबाबत कलेक्टरला सांगितले आहे बांधावर जाऊन काम करायला. मी घरी बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही”, असेही शिंदे म्हणाले.

- Advertisement -

“शरद पवार मोठे नेते आहेत. पण स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदू नेते नाहीत, तर ते देशाचे गौरव आहेत. ज्यांनी सावरकरांचा अपमान केला त्यांच्याविरोधात सावरकर गौरव यात्रा निघाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मणीशंकरच्या कानाखाली जोडे मारले होते. पण बाळासाहेबांचे वारस म्हणणारे आता तशी हिमंत करणार का?”, असा सवाल उपस्थित करत ठाकरेंवर निशाणा साधला.

“राज्यात दाऊदच्या संबंधात नेत्यांना अटक झाली तेव्हा कोणाचं सरकार होत? दंगली झाल्या, साधू संतना मारहाण केली, पत्रकारांना अटक केली, नेव्ही ऑफिसरला मारले तेव्हा कोणाचे सरकार होते?”, असाही सवाल यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.


हेही वाचा – बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले; ‘तारीख नही बतायेंगे’ म्हणणाऱ्यांना पंतप्रधानांनी बसवले घरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -