Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश चंद्र आला कवेत; भारताच्या चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लॅंडिंग

चंद्र आला कवेत; भारताच्या चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लॅंडिंग

Subscribe

चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले आहे.

नवी दिल्ली : भारतवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या चांद्रयान-3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर यशस्वीरित्या लॅंडीग झाले आहे. अखेर भारताने चंद्राच्या ध्रृवार तिरंगा फडकवला आहे. इस्रोच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कामगिरी असून, या मोहिमेच्या यशामुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.(The moon came to the poem India’s Chandrayaan-3 successfully landed on the moon)

चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले आहे. चांद्रयान-३ चे लँडर विक्रम चंद्रावर यशस्वीपणे उतरले असून, काही वेळेनंतर उतरलेल्या ठिकाणावरील धूळ शांत झाल्यानंतर विक्रम लॅंडर सुरू होणार असून, तेथून ते लॅंडर आंतरराळ संस्थेशी संवाद साधणार आहे.

- Advertisement -

भारतीयांसाठी अभिमानास्पद असणारी कामगिरी आज इस्रोने करून दाखवली आहे. कारण, भारताच्या चांद्रयान-3 ने यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लॅंडिक केली असून, ही कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. कारण याआधी प्रयत्न करणाऱ्या रशिया आणि चीनसारखे विकसीत देशसुद्धा या कामगिरीत अपयशी ठरले होते.

एक तास 50 मिनिटानंतर बाहेर निघणार ‘प्रज्ञान’

- Advertisement -

चांद्रयान-3 चा विक्रम लॅंडर चंद्रावर यशस्वीपणे उतरले आहे. आता रोव्हर प्रज्ञान त्याच्या आतून बाहेर येण्याची वाट पाहत आहे. यास सुमारे 1 तास 50 मिनिटानंतर प्रज्ञान बाहेर निघणार आहे. उतरलेल्या ठिकाणावरील धूळ ओसरल्यानंतर विक्रम लॅंडर संवाद साधेल. त्यानंतर रॅम्प उघडेल आणि प्रज्ञान रोव्हर रॅम्पवरून चंद्राच्या पृष्ठभागावर येईल. यानंतर त्याची चाके चंद्राच्या मातीवर ‘अशोक स्तंभ’ आणि ‘इस्रो’च्या लोगोची छाप सोडणार आहेत. त्यानंतर विक्रम लँडर प्रग्यानचा फोटो घेईल आणि प्रज्ञान विक्रमचा फोटो काढेल. ते हा फोटो पृथ्वीवर पाठविणार आहेत.

हेही वाचा : भारतासाठी अविस्मरणीय क्षण – पंतप्रधान नरेंद्र मोदी

अशी झाली सॉफ्ट लॅंडिंग

चांद्रयान-3 चे लँडिंग (चंद्रावरील वेळेनुसार) पहाटे 5.30 वाजता सुरू झाले. रफ लँडिंग खूप यशस्वी झाली. यानंतर लँडरने पहाटे 5.44 वाजता उभी लँडिंग केली. तेव्हा चंद्रापासून चांद्रयान-3 चे अंतर 3 किमी होते. चांद्रयान-3 ने आपल्या 20 मिनिटांत चंद्राच्या शेवटच्या कक्षेतून 25 किमीचा प्रवास पूर्ण केला. त्यानंतर लँडर हळूहळू खाली उतरवण्यात आले. लँडरने संध्याकाळी 6.04 वाजता चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. अशा प्रकारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.

हेही वाचा : जो मुलगा नालायक असतो, तो आपल्या पूर्वजांना दोष देत असतो…, काँग्रेसची भाजपावर टीका

इंडिया ऑन द मून-इस्रो

या लॅंडिंगचे थेट प्रक्षेपण सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा ही लॅंडिंग दक्षिण अफ्रिकेतून लाईव्ह पाहत होते. सॉफ्ट लॅंडिंग झाल्यानंतर इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी पंतप्रधाना उद्देशून म्हटले की, इंडिया ऑन द मून असे म्हणत आपली मोहिम यशस्वी झाल्याचे सांगितले.

- Advertisment -