घरदेश-विदेशकेंद्राच्या आदेशानेच म. प्र. कॉंग्रेस सरकार पाडलं; भाजप मंत्र्याचा व्हिडिओ व्हायरल!

केंद्राच्या आदेशानेच म. प्र. कॉंग्रेस सरकार पाडलं; भाजप मंत्र्याचा व्हिडिओ व्हायरल!

Subscribe

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला असून यामध्ये प्रदेशातील कॉंग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वातून आदेश मिळाला, असं या ऑडिओत म्हटलं आहे.

मध्यप्रदेशमध्ये सरकार स्थापनेवरुन राजकारण तापलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन आता मध्य प्रदेशातील कॉंग्रेसने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.  मध्य प्रदेशातील कॉंग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वातून आदेश मिळाला, असं या ऑडिओत म्हटलं आहे. यावरुन मध्य प्रदेश कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “मोदी जी तुम्ही लोकशाहीची हत्या केली आहे, की तुमचे मुख्यमंत्री सवयीने हे बोलत आहेत,” असा सवाल मध्य प्रदेश कॉंग्रेसने ट्वीट करत मोदींना विचारला आहे.

- Advertisement -

व्हायरल ऑडिओ इंदूरच्या रेसिडेन्सी मधला आहे. शिवराजसिंह चौहान इंदूरच्या रेसिडेन्सीमध्ये संवेरच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्यांच्यासमवेत माजी मंत्री तुलसी सिलावट देखील होते. तुलसी सिलावट हे शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. या व्हायरल ऑडिओच्या सत्यतेची अद्याप पुष्टी झालेली नाही. मात्र, या व्हायरल ऑडिओवरुन राजकारण तापलं आहे.

व्हायरल ऑडिओमध्ये शिवराज काय बोलले?

“केंद्रीय नेतृत्त्वाने ठरवलं की सरकार पाडलं पाहिजे. ते उद्ध्वस्त केलं पाहिजे. आणि ज्योतिरादित्य शिंदे आणि तुलसीभाय शिवाय सरकार पडलं असतं का? तुम्हीच सांगा. आणि दुसरा मार्ग नव्हता. हे मंत्री तिथेही होते. मुख्यमंत्री होण्याचा विचार केला नव्हता.आता कॉंग्रेसवाले सांगत आहेत की गडबड केली. घोटाळा केला. आज मी या व्यासपीठावरून संपूर्ण आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणाने सांगत आहे, कॉंग्रेसने फसवणूक केली आहे. ज्योतिरादित्य शिंदे आणि तुलसी सिलावट यांनी धोका दिलेला नाही. वेदना आणि अडचणींमुळे मंत्रीपद सोडलं. नाही तर सरपंचपद पण कोणी सोडत नाही. आज मी ज्योतिरादित्य शिंदे आणि तुलसी भाई यांचं स्वागत करतो कारण भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी मंत्रीपद सोडलं. आणि आता निवडणुका घेतल्या जात आहेत. प्रामाणिकपणे सांगा की जर तुलसी सिलावट आमदार झाले नाहीत तर आपण मुख्यमंत्री होऊ का? भाजपा सरकार टिकेल का? हे प्रत्येक भाजप कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे की तुम्ही त्यांना निवडून द्या. तुलसी सिलावट निवडणूक लढवत नाही, तुम्ही सर्व निवडणुका लढवत आहात. आम्ही उमेदवार आहोत.” असं या व्हायरल ऑडिओमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

Confession by Shivraj Singh Chauhan

कांग्रेस पार्टी शुरू दिन से कह ही थी कि मोदी-शाह ने लोकतंत्र की हत्या कर कमलनाथजी के नेतृत्व की कांग्रेस सरकार को गिराया हैं..। इस आरोप की पुष्टि स्वयं शिवराज सिंह ने ही कर दी कि “केंद्रीय नेतृत्व ने तय किया था कि सरकार गिरनी चाहिए”..। – सत्य को कितना भी छुपाओं नहीं छुपता है..।

Posted by Ankit Laxman Dholi on Wednesday, 10 June 2020

लबाडी सर्वांसमोर आली – माजी मुख्यमंत्री कमलनाथ

सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपतींकडे जाणार – माजी मंत्री जीतू पटवारी

काल स्वत: मुख्यमंत्र्यांनी इंदूरमध्ये सत्य उघड केलं. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मदतीने कॉंग्रेसचे सरकार पाडण्यात आलं. राज्यात कॉंग्रेसचं सरकार असावं अशी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची इच्छा नव्हती. कॉंग्रेस सुरुवातीपासूनच सांगत आहे की भाजपने कट रचून सरकार पाडलं. शिवराज जी यांनी कॉंग्रेसच्या आरोपाची पुष्टी केली आहे. यासंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घेत आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि राष्ट्रपतींकडे दाद मागू, असं माजी मंत्री जीतू पटवारी यांनी बुधवारी इंदूरमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं.

२० मार्च रोजी कमलनाथ सरकार पडलं

१० मार्च रोजी मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारच्या २२ आमदारांनी राजीनामा दिला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. राजीनामा देणारे २२ आमदारही भाजपमध्ये दाखल झाले. २० मार्च रोजी कमलनाथ सरकार पडलं. अंतर्गत वादामुळे कॉंग्रेसचं सरकार पडलं, असं भाजपने म्हटलं होतं.

पोटनिवडणुकीसंदर्भात वाद सुरू

निवडणूक आयोगाने अद्याप २४ जागांच्या पोटनिवडणुकीच्या तारखांची घोषणा केलेली नाही, परंतु कॉंग्रेस आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. पोटनिवडणूक सप्टेंबरमध्ये अपेक्षित आहे. २३० जागा असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेचे सध्या २०६ सदस्य आहेत. त्यात भाजपचे १०७ आणि कॉंग्रेसचे ९२ सदस्य आहेत. चार अपक्ष, एक समाजवादी पार्टी आणि बसपाचे दोन आमदार सरकारला पाठिंबा देत आहेत. सध्या बहुमत १०४ वर आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -