Saturday, February 20, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश कोरोनानंतर आता बर्ड फ्ल्यूच्या नव्या विषाणूचं माणसामध्ये संक्रमण

कोरोनानंतर आता बर्ड फ्ल्यूच्या नव्या विषाणूचं माणसामध्ये संक्रमण

Related Story

- Advertisement -

एकीकडे कोरोना संकट असताना आता नवं संकट समोर आलं आहे. कोरोनाच्या विषाणूनंतर आता बर्ड फ्ल्यूच्या विषाणूचं माणसामध्य संक्रमण झालं आहे. बर्ड फ्ल्यूच्या H5N8 या नव्या विषाणूची एका व्यक्तीला लागण झाली आहे. हा रुग्ण रशियातील आहे. रशियाच्या आरोग्य अधिकारी अँना पोपोवा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. जगभरातील हे पहिलं उदाहरण आहे. त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत अलर्ट दिला आहे.

रशियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती देताना आमच्या वैज्ञानिकांनी बर्ड फ्ल्यू विषाणूचा H5N8 या नव्या स्ट्रेनचा मानवामध्ये आढळून आल्याचं सांगितलं. यानंतर आम्ही याची WHO ला माहिती असं देखील त्यांनी सांगितलं. दरम्यान, हा विषाणू नवा असून पक्षांसाठी जीवघेणा आहे.

- Advertisement -

हा विषाणू याआधी माणसांमध्ये आढळला नव्हता. एका पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या सात जणांमध्ये हा विषाणू आढळला. या विषाणूचा जनुकीय पदार्थ वैज्ञानिकांनी व्हिक्टर लॅबमध्ये विलगीकरणात ठेवला आहे. या भागात डिसेंबरमध्ये बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाला होता, अशी माहिती पोपोवा यांनी दिली. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांमध्ये हा विषाणू सापडला आहे, त्यांच्या प्रकृतीवर अद्याप कोणतेही गंभीर परिणाम दिसून आलेले नाहीत, असं देखील पोपवा म्हणाल्या. या नव्या स्ट्रेनचा शोध महत्वपूर्ण असून विषाणू म्यूटेट करता येईल का हे आताच कळू शकेल. या संभाव्य म्युटेशिन विरोधात रशियासह जगाला तयारी करण्यासाठी वेळ मिळेल, असं पोपोवा म्हणाल्या.

 

- Advertisement -