घरदेश-विदेशधक्कादायक : 'ब्रा'मध्ये लपवल्या 'सोन्याच्या विटा'

धक्कादायक : ‘ब्रा’मध्ये लपवल्या ‘सोन्याच्या विटा’

Subscribe

सोन्याची तस्करी करणाऱ्या एका थाई महिलेला चेन्नई विमानतळावर अटक करण्यात आली असून तिच्या ब्रामधून सोन्याच्या दोन विटा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सोन्याची तस्करी करणारे वेगवेगळी शक्कल लढवत असतात. मध्यंतरी सोनं तस्करी करणाऱ्या एका महिलेने सोन्याची पेस्टे तयार करुन ९० लाखांची तस्करी केल्याचे उघडकीस आले होते. ही घटना ताजी असतानाच एका महिलेने सोन्याची तस्करी करण्यासाठी एक नवा फंडा वापरुन तस्करी केल्याचे उघडकीस आले आहे. सोन्याची तस्करी करणाऱ्या एका थाई महिलेला चेन्नई विमानतळावर अटक करण्यात आली असून तिच्या ब्रामधून सोन्याच्या दोन विटा जप्त करण्यात आल्या आहेत. अनेकदा बॅगमध्ये आणि अंडरगारमेंट्समध्ये सोनं लपवून तस्करी केली जाते. पण ब्रामध्ये सोने लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न केला गेल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. क्रेसॉर्न थॅम्प्राकॉप (३८) असे या महिलेचे नाव आहे.

असा उघडकीस आला गुन्हा

क्रेसॉर्न थॅम्प्राकॉप बँगकॉकहून चेन्नईला आली होती. चेन्नई विमानतळावरील फूल बॉडी स्कॅनरमधून जात असताना तिच्याकडे कोणतातरी धातू असल्याचे समोर आले. त्यामुळे विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिची कसून तपासणी केल्यानंतर तिच्या ब्रामध्ये एक चोर कप्पा तयार करण्यात आला होता. या चोरकप्प्यात ४७ लाख रुपयांच्या सोन्याच्या विटा ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

- Advertisement -

क्रेसॉर्न पहिल्यांदाच बँगकॉकहून चेन्नईला आली होती. या सोन्याच्या विटा तिने चंदीगडच्या एका पंजाबी माणसाला देण्यासाठी आणल्या असल्याचे तिने सांगितले आहे. तसेच भारताची विनामुल्य सहल आणि भरपूर पैसे मिळतात म्हणून अनेक विदेशी पर्यटक सोन्याची तस्करी करण्यास तयार होतात आणि क्रेसॉर्न देखील त्यातीलच एक होती.

सोन्याच्या विटांची तस्करी

क्रेसॉर्नने चंदीगडच्या एका पंजाबी माणसाला देण्यासाठी सोन्याच्या विटा आणल्या होत्या. तसेच हा इसम क्रेसॉर्न हिची विमानतळावर वाट पाहत होता. त्याच्याकडे तिच्या व्हॉट्सअॅपचा डिपी होता. त्यानुसार सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला विमानतळाबाहेर सोडले. वाहनतळामध्ये क्रेसॉर्न शिरताच एक माणून तिच्या दिशेने सरसावला. हे सापळा लावणाऱ्या पोलिसांनी पाहिले आणि त्या इसमाचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. लवलीन असे या इसमाचे नाव असून तो चंदीगडचा एक छोटा व्यापारी आहे. तसेच लवलीनची प्रेयसी सपना बँगकॉकला राहत असून हे दोघे सोन्याची तस्करी करत होते. क्रेसॉर्नला सपनानेच सोन्याच्या विटा दिल्या असल्याचे लवलीनने पोलिसांना सांगितले. तसेच लवलीन क्रेसॉर्नला चेन्नईहून दिल्लीला घेऊन जाणार असून दोघंही पहिल्यांदाच चेन्नईला आले असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

वाचा – सोन्याची पेस्ट करुन तस्करी करणारी महिला अटकेत

वाचा – लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या समुद्री घोड्यांची तस्करी; ३० किलो साठा जप्त


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -