घरCORONA UPDATEThird Wave of corona: काही दिवसात भारतात येणार Corona ची तिसरी...

Third Wave of corona: काही दिवसात भारतात येणार Corona ची तिसरी लाट, नव्या रिपोर्टनुसार भारताला अलर्ट जारी

Subscribe

देशात बुधवारी ९ हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद

जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटनही हाहाकार माजवला आहे. भारतातही ओमिक्रॉन बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक राज्यांना सध्या अलर्ट देण्यात आला आहे. दिल्लीसह महाराष्ट्रात कोरोना तसेच ओमिक्रॉनची रुग्णसंख्या मागच्या काही दिवसात झपाट्याने वाढली आहे. यातच आता भारतात लवकरच कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे शास्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे. केंब्रिज विद्यापिठातील जज बिझनेस स्कूलचे प्रोफेसर पॉल कट्टुमन यांच्याकडून हा इशारा भारताला देण्यात आला आहे.

कट्टुमन आणि त्यांच्या संपूर्ण टीमने भारताता सध्या वाढत असलेल्या कोरोना रुग्णांचा अभ्यास केला. त्यांच्या टीमने तयार केलेल्या ट्रॅकरनुसार देशातील ६ राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुढील काही दिवसात या राज्यातील रुग्णसंख्या आणखी वाढेल असे त्यांनी म्हटले आहे. तसेच दररोज या राज्यात किती रुग्ण वाढतील या अंदाज बांधणे जरी कठीण असले तरी रुग्णसंख्या झपाट्याने वाढून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या आकडेवारीनुसार देशात बुधवारी ९ हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे राज्य आणि केंद्र सरकारने त्वरित कठोर पाऊले उचलवण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. मागील आठवड्यातच पंतप्रधान मोदींनी ३ जानेवारी २०२२ पासून देशातील १५ – १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे.

दिल्लीतील कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता दिल्लीतील सिनेमागृहे,शाळा आणि जिम बंद करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे दिल्लीत तसेच महाराष्ट्रातही नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण घराबाहेर पडले त्यांना देखील पार्ट्या आणि समारंभ करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  Omicron Variant: देशातील वाढत्या ओमिक्रॉनमुळे पंतप्रधान मोदींनी यूएई दौरा ढकलला पुढे

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -