घरताज्या घडामोडीयंदाच्या वर्षात देशभरात 3 हजार किलोपेक्षा अधिक सोने जप्त, केरळात सर्वाधिक तस्करी

यंदाच्या वर्षात देशभरात 3 हजार किलोपेक्षा अधिक सोने जप्त, केरळात सर्वाधिक तस्करी

Subscribe

मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षात देशभरातून 3 हजार किलोपेक्षा सर्वाधिक सोने जप्त करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यात 3,083 किलो सोने जप्त करण्यात आल्याची माहिती संसदेत देण्यात आली आहे. केरळात सोन्याची सर्वाधिक तस्करी दिसून आली आहे. 2021 मध्ये देशभरातून 2,383 किलो आणि 2020 मध्ये 2,154 किलो सोने जप्त करण्यात आले. तर 2019 मध्ये 3,673 किलो सोने जप्त करण्यात आले होते. 2022 मध्ये 3,588 प्रकरणांमध्ये 3,083.61 किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

कोणत्या राज्यातून किती सोने जप्त?

- Advertisement -

केरळ राज्याबद्दल बोलायचे झाले तर 2022 मध्ये 948 प्रकरणांमध्ये 690 किलो सोने जप्त करण्यात आले होते. तर 2021 मध्ये 587 किलो आणि 2020 मध्ये 406 किलो सोने जप्त करण्यात आले. तसेच 2019 मध्ये 725 किलो सोने जप्त करण्यात आले होते. केरळ व्यतिरिक्त, नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात सोन्याच्या तस्करीची 484 प्रकरणं समोर आली आहेत, ज्यामध्ये 474 किलो सोने जप्त करण्यात आले. तामिळनाडूमध्ये 809 प्रकरणं नोंदवली गेली आणि 440 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये 214 प्रकरणं नोंदवली गेली आणि 369 किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, सीमा शुल्क क्षेत्र अधिकारी आणि महसूल गुप्तचर संचालनालयातून (DRI)सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, सीमाशुल्क असूनही सोन्याची तस्करी होत आहे. आयात आणि तस्करी यांच्यात काही नमुना आणि संबंध आहे का?, अशी विचारणाही त्यांनी गुप्तचर अधिकाऱ्यांना केली होती.

- Advertisement -

2021-22 मध्ये सोन्याची आयात 33 टक्क्यांनी वाढून 46.14 अब्ज झाली आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्यातील व्यापारी देश आहे. गेल्या तीन वर्षांत राष्ट्रीय तपास संस्थेने सोने तस्करीच्या तीन प्रकरणांचा तपास करून आरोपपत्र दाखल केले आहेत, असं अर्थ राज्यमंत्री चौधरी म्हणाले.


हेही वाचा : ४० कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या बाहेर, राज्यसभेत सरकारकडून माहिती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -