घरदेश-विदेशमुलांना जन्म देणाऱ्यांना कंपनीची मोठी ऑफर, साडे 11 लाख बोनससह मिळणार 1...

मुलांना जन्म देणाऱ्यांना कंपनीची मोठी ऑफर, साडे 11 लाख बोनससह मिळणार 1 वर्षाची रजा

Subscribe

चीनच्या लोकसंख्येमुळे बराच काळ त्रासलेला आहे. त्यामुळे चीनने आपल्या देशात एक अपत्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे आता चीनमध्ये आपल्या एकूण लोकसंख्येमध्ये वृद्धांची संख्या जास्त आहे आणि देशाला काम करणाऱ्या तरुणांच्या कमतरतेची समस्या भेडसावत आहे.

नवी दिल्लीः Trending News In Marathi: जिथे भारत त्याच्या सतत वाढत्या लोकसंख्येमुळे त्रस्त आहे. तर दुसरीकडे लोकसंख्येच्या नावावर जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असलेल्या चीनकडूनच आता मुले जन्माला घालण्याची ऑफर दिली जात आहे. या धोरणांतर्गत चीनमध्ये आता तीन मुले जन्माला घालण्यास सूट दिली जात आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चीनची लोकसंख्या वाढण्याची शक्यता आहे.

वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे चीन चिंतेत

चीन लोकसंख्येमुळे बराच काळ त्रासलेला आहे. त्यामुळे चीनने आपल्या देशात एक अपत्याचे धोरण स्वीकारले होते. आता चीनमध्ये आपल्या एकूण लोकसंख्येमध्ये वृद्धांची संख्या जास्त आहे आणि देशाला काम करणाऱ्या तरुणांच्या कमतरतेची समस्या भेडसावत आहे.

- Advertisement -

लोकसंख्या वाढवण्यासाठी चीनची अनोखी योजना

दरम्यान, देशात दोनपेक्षा जास्त मुले जन्माला घालण्याची परवानगी देण्यात आलीय. सध्या तरी याला गती देण्यासाठी कंपन्या आता आपल्या कर्मचाऱ्यांना मुले होण्यासाठी प्रवृत्त करताना दिसत आहेत. ज्याअंतर्गत चीनमध्ये पहिल्या बाळाला जन्म देण्यासाठी 30 हजार युआन (सुमारे 3 लाख 50 हजार रुपये), दुसऱ्या मुलाला 60 हजार युआन (सुमारे 7 लाख रुपये) आणि तिसऱ्या मुलाला 90 हजार युआन (सुमारे 11.50 लाख रुपये) दिले जातात.

तिसरे मूल होण्यासाठी मोठे बक्षीस

चीनमध्ये ही ऑफर तिथल्या एका टेक कंपनी बीजिंग डबेनॉन्ग टेक्नॉलॉजी ग्रुपने दिलीय. सुमारे 11.50 लाख रुपयांव्यतिरिक्त कंपनी तिसरे मूल झाल्यास 12 महिन्यांची सुट्टी देखील देत आहे. याशिवाय चीनमधील काही प्रांतांची सरकारेही तिसरे मूल जन्माला घालण्यासाठी बोनस देताना दिसत आहेत. येथे काही स्थानिक सरकारांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाच्या जन्मावर पैसे देण्याची घोषणा केलीय. त्याच वेळी चीन सरकारने महिलांच्या गर्भधारणेदरम्यान 98 दिवसांच्या मातृत्वाच्या रजेबद्दल सांगितलेय.

- Advertisement -

हेही वाचाः राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने आज संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार, देशाच्या आर्थिक आरोग्याचे रहस्य उघडणार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -