घरदेश-विदेशपाकमध्ये दाखवला जम्मू- काश्मीरचा भाग; WHOच्या वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा

पाकमध्ये दाखवला जम्मू- काश्मीरचा भाग; WHOच्या वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा

Subscribe

तो नकाशा एक रंग सूचक नकाशा असून ज्यात एकूण कोरोना रुग्णसंख्येनुसार निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा वापरल्या जातात.

तृणमूलचे खासदार डॉ. संतनु सेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्यात आल्याचे म्हटले आहे. खासदार डॉ. संतनु यांनी पत्रात लिहिले की, “जेव्हा मी WHO च्या Covid19.int साइटवर क्लिक केले, तेव्हा जगाचा एक नकाशा प्रदर्शित झाला यात जेव्हा मी भारताचा भाग झूम केले तेव्हा एक निळा नकाशा दिसत होता, आश्चर्याची गोष्ट म्हणजे जम्मू आणि काश्मीरसाठी (J&K) दोन वेगवेगळ्या रंगांचा वापर करण्यात आला होता. जेव्हा त्यांनी निळ्या भागावर क्लिक केले तेव्हा नकाशात भारताचा डेटा दिसत होता. मात्र दुसऱ्या भागात पाकिस्तानचा डेटा दाखवत जात होता.

खासदारांनी पत्रात पुढे लिहिले की, याशिवाय, आपल्या भारतीय नकाशातील अरुणाचल प्रदेश राज्याचा भाग देखील वेगळा सीमांकित केला आहे. त्यांनी पुढे असे म्हटले की, हा एक आंतरराष्ट्रीय मुद्दा असून आपल्या सरकारने याची चौकशी यापूर्वीच केली पाहिजे होती. या मुद्दावर सतर्क होत आवाज उठवला पाहिजे होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईट होमपेजवर जगाचा एक इंटरेक्टिव नकाशा आहे. ज्याद्वारे विविध देशांमध्ये दररोज नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्य़ा दर्शवली जाते.

- Advertisement -

तो नकाशा एक रंग सूचक नकाशा असून ज्यात एकूण कोरोना रुग्णसंख्येनुसार निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा वापरल्या जातात. एकूण 50 लाखांहून अधिक रुग्णसंख्या असलेल्या भागासाठी नकाशामध्ये सर्वात गडद निळा रंग वापरला गेला आहे. यात संपूर्ण भारत निळ्या रंगात दाखवण्यात आला आहे, तर जम्मू आणि काश्मीर राखाडी रंगात दाखवण्यात आला आहे. नकाशाच्या संदर्भ तक्त्यामध्ये राखाडीचा अर्थ लागू होत नाही असे लिहिले आहे.


Vishwasghat Diwas : मोदी सरकारने केलेल्या ‘विश्वासघाता’विरोधात आज शेतकरी संघटनांचे आंदोलन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -