घरमहाराष्ट्रनाशिकगॅस गिझरने तरुणीचा बळी

गॅस गिझरने तरुणीचा बळी

Subscribe

उपनगरमध्ये शनिवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान घडली घटना

नाशिक : गॅस गिझरचा वास नाकातोंडात गेल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उपनगरमध्ये शनिवारी (दि.२९) सायंकाळी ६ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. साक्षी अनिल जाधव (वय २२, रा. संकुल अपार्टमेंट, जेलरोड, नाशिक) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

अशी घ्या काळजीगॅस गिझरने तरुणीचा बळी

  • रात्री झोपण्यापूर्वी गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर बंद करा.
  • रेग्युलेटरची पांढरी कॅप रात्री सिलिंडरला लावावी.
  • गॅसचा वास आल्यास तत्काळ घराचे दरवाजे, खिडक्या उघडाव्यात.
  • गॅसचा वास आल्यास काडीपेटी, लायटर पेटवू नये. तसेच, पंखे व बल्बही सुरु करु नयेत.
  • घरात गॅसने पेट घेतल्यास चादर पाण्यात बुडवून ती सिलिंडर भोवती गुंडाळा.
  • गॅस दुर्घटना घडल्यास मदतीसाठी अग्नीशमन दलाशी संपर्क साधावा.

हिवाळ्यामुळे गॅस गिझरचा वापर वाढला आहे. गॅस बाथरुमच्या बाहेर असला पाहिजे. त्यातून कार्बन मोनॉक्साईड बाहेर येत असतो. तो धोकादायक असतो. एक्झॉस्ट फॅन लावावा. तो बाथरुममध्ये असावा.
– डॉ. वैभव पाटील, एम.डी.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -