घरदेश-विदेशBF.7ची तीन प्रकरणे आढळली, सर्व विमानतळांवर प्रवाशांचे आजपासून रँडम सॅम्पलिंग

BF.7ची तीन प्रकरणे आढळली, सर्व विमानतळांवर प्रवाशांचे आजपासून रँडम सॅम्पलिंग

Subscribe

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता, आजपासूनच देशभरातील विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या रँडम सॅम्पलिंगला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. चीनमध्ये हाहाकार माजविणाऱ्या ओमायक्रॉनच्या BF.7 या व्हेरियंटची तीन प्रकरणे भारतातही आढळली आहेत. त्यामुळे देशाचे सरकार सतर्क झाले असून, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी कोविड आढावा बैठक घेतली.

भारतात BF.7चे पहिले प्रकरण गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरने ऑक्टोबरमध्ये शोधले होते. आतापर्यंत गुजरातमध्ये दोन तर ओदिशातून एक प्रकरण समोर आल्याची माहिती आहे. बुधवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली कोविड आढावा बैठकही झाली. बैठकीदरम्यान, तज्ञांनी सांगितले की, कोविड प्रकरणांमध्ये आतापर्यंत कोणतीही मोठी वाढ झाली नसली तरी, विद्यमान आणि उदयोन्मुख उप-प्रकारांचा मागोवा ठेवण्यासाठी सतत पाळत ठेवणे आवश्यक आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सज्जतेचे तसेच नव्या आणि उदयाला येणाऱ्या कोविड-19 व्हेरियंटच्या प्रतिबंधासाठी सज्ज राहण्याचे आणि दक्ष राहण्याचे निर्देश दिले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच जून 2022मध्ये कोविड-19 संदर्भात सुधारित मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. यामध्ये वेळेवर निदान, विलगीकरण, चाचणी आणि संशयित तसेच आजाराची पुष्टी केलेल्या रुग्णाचे योग्य व्यवस्थापन यांचा समावेश आहे. या सर्वांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिले.

- Advertisement -

लसीकरण आणि मास्क वापरण्याचे आवाहन
ज्यांचे लसीकरण अद्याप बाकी आहे, त्यांनी ते करून घ्यावे आणि गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, असे आवाहनही केंद्र सरकारने केले आहे. गर्दीत शक्यतो मास्क वापरावा आणि सोशल डिस्टन्सिंगचीही काळजी घ्यावी लागेल. ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी वेळीच लस घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. आवश्यक असल्यास, मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात येईल, असे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -