घरदेश-विदेशPM Narendra Modi यांच्यावरील टीका पडली महागात, मालदीवमधील तीन मंत्री निलंबित

PM Narendra Modi यांच्यावरील टीका पडली महागात, मालदीवमधील तीन मंत्री निलंबित

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालदीव दौऱ्यावर मालदीवमधील मंत्र्यांनीच टीका केली आहे. त्यामुळे आता या तिन्ही मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : PM Narendra Modi हे नुकतेच लक्षद्वीपच्या दौऱ्यावर जाऊन आले आहेत. त्यांचे या दौऱ्यावरील फोटो आणि मालदीव बेटावरील फोटो बरेच व्हायरल झाले आहेत. त्यांच्या या फोटोंना अनेकांनी पसंती दर्शवली, तर काहींकडून टीका देखील करण्यात आली. परंतु, मोदींच्या या दौऱ्यामुळे आता मालदीवच्या तीन मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. ज्यामुळे पंतप्रधानांच्या या दौऱ्याची सर्वाधिक चर्चा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालदीव दौऱ्यावर मालदीवमधील मंत्र्यांनीच टीका केली आहे. त्यामुळे आता या तिन्ही मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंतप्रधानांवर करण्यात आलेल्या या टीकेनंतर आता #BoycottMaldives हे ट्रेंड होत आहे. मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर वर्णद्वेषाची टीका तर केलीच आहे. पण एका महिला मंत्र्यांनी त्यांना ‘इस्रायलची कठपुतली’ म्हणून देखील हिणवले आहे. पंतप्रधानांवर टीका केल्यानंतर मालदीवच्या सरकारने मंत्री मालशा शरीफ, मरियम शिउना आणि अब्दुल्ला महजूम माजित यांना निलंबित केले आहे. (Three Maldives ministers suspended for criticizing PM Narendra Modi)

हेही वाचा… पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सोशल मीडियावर का ट्रेंड होतंय #BoycottMaldives

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या दौऱ्यामध्ये मालदीव बेटाला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील काही फोटो हे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटला पोस्ट केले. भारतीयांनी मालदीवला कायमच पर्यटनाच्याबाबत प्रथम पसंती दिली आहे. मालदीवमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीयांचा मोठा वाटा आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही, पण तरी देखील मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अनेक भारतीयांनी मालदीवला जाण्याचा प्लॅन रद्द केला आहे. तर यामुळे आता मालदीवच्या पर्यटनाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर मालदीवमधल्या सत्ताधारी पक्षाचे नेते झाहिद रमीझ यांनी मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर टीका केली. भारत पैसे कमावण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. झाहिद रमीझ यांच्या वक्तव्यानंतर लगेच मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला विभागाच्या मंत्री मरियम शिउना यांनी सुद्धा मोदींच्या या दौऱ्यावर टीका करत मोदींना ‘विदूषक’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असे म्हटले. यानंतर महजूम माजिद आणि मालशा शरीफ यांनीही पंतप्रधानांवर टीका केली.

- Advertisement -

यानंतर आता या तिन्ही मंत्र्यांना निलंबित करण्यात आले आहे. पण, मालदीव सरकारचे प्रवक्ते आणि मंत्री इब्राहिम खलील यांनी भारतातील एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत या वक्तव्यांचा निषेध केला. तर ते म्हणाले की, वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांना त्यांच्या पदावरून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच, मालदीवचे माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सोलिह म्हणाले की, मालदीव सरकारमधील मंत्र्यांनी समाजमाध्यमांवर भारताविरोधात वापरलेल्या द्वेषपूर्ण भाषेचा मी निषेध करतो. या टीकेनंतर भारताने मालदीवमधील मुइज्जू सरकासमोर याबाबत नाराजी व्यक्त केली. ज्यानंतर मालदीव सरकारने एक निवेदन प्रसिद्ध करत, आमच्या मंत्र्यांनी केलेली व्यक्तव्ये ही त्यांची वैयक्तिक आहेत. मालदीव सरकारचा त्याच्याशी संबंध नाही, असे जाहीरपणे सांगितले आहे.

भारत-मालदीवचे संबंध बिघडणार?

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी मोहम्मद मुइज्जू निवडून आल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि मालदीवच्या संबंधांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये मुइज्जू यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. पदावर येताच त्यांनी भारतासोबतच्या काही धोरणांमध्ये बदल केला. तसेच मालदीवमध्ये असलेले भारतीय लष्करी अधिकारी पुन्हा मायदेशी पाठवले. मोहम्मद मुइज्जू हे चीनधार्जिणे असल्याचा त्यांच्यावर अनेकदा आरोप झाला आहे. पण आता या प्रकरणानंतर भारत आणि मालदीवमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -