घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरRiteish Deshmukh : काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत भाऊ अमित देशमुखांबद्दल रितेश यांनी केले...

Riteish Deshmukh : काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत भाऊ अमित देशमुखांबद्दल रितेश यांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले…

Subscribe

लातूर – अमित देशमुख यांच्याकडून लातूरला खुप मोठ्या अपेक्षा आहेत, त्यासोबतच महाराष्ट्रालाही मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे आता तुम्ही पुढचं पाऊल उचलंल पाहिजे, असं सांगत अभिनेता रितेश देशमुख यांनी त्यांचे मोठे बंधू आणि आमदार अमित देशमुख यांनी आता महाराष्ट्राचे नेतृत्व करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. लातूर तालुक्यातील निवळी येथे आज (18 फेब्रुवारी) विलास सहकारी साखर कारखाना परिसरात दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे, आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख, दिलीपराव देशमुख, उल्हास पवार आणि देशमुख कुटुंबीय उपस्थित होते.

काँग्रेसचे आणि मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मराठवाड्यात विलासराव देशमुख यांच्यानंतर काँग्रेसमधील मोठे नेते म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या नेतृत्व पोकळीची जाणीव रितेश देशमुख यांनी यावेळी करुन दिली.

- Advertisement -

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर सर्वांचा नजरा या विलासराव देशमुख यांचे पूत्र अमित आणि धीरज आता काय निर्णय घेणार याकडे लागले होते. त्यावर त्यांनी आम्ही काँग्रेस सोडणार नाही, असे स्पष्ट केले. आमदार अमित देशमुख हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यांची भाषणशैली ही वडील विलासराव देशमुख यांच्याप्रमाणेच असल्याचे मानले जाते. मात्र अमित देशमुख अजुन राज्याचे नेते म्हणुन पुढे आलेले नाहीत. रविवारी लातूरमधील कार्यक्रमाच्या निमित्ताने रितेश देशमुख यांनी आमदार अमित देशमुख यांनी आता पुढे येऊन काम करावे, असे सुचवत राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व म्हणून त्यांनी काम करावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

विलासरावांच्या आठवणींना रितेश देशमुख भावूक

विलासराव देशमुख यांच्या निधनाला बारा वर्षे झाली आहेत, असे सांगत रितेश देशमुख भावूक झाले. त्यावेळी अमित देशमुख यांनी त्यांच्याजवळ येत रितेश यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना धीर दिला. त्यानंतर रितेश यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. विलासराव देशमुख यांची वडील म्हणून उणिव अजुनही भासते. मात्र याकाळात काका दिलीपराव देशमुखांनी वेळोवेळी साथ दिली. काकांबद्दल बोलायला फारसा वेळ मिळत नाही. पण त्यांची साथ ही मोलाची असते असे रितेश देशमुख म्हणाले.

- Advertisement -

भावाला  काय देता येईल हा देशमुख बंधूंचा विचार – रितेश देशमुख

विलासराव देशमुख आणि दिलीपराव देशमुख या दोन्ही भावांमध्ये कधीही अंतर पडले नाही. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तरी दिलीपरावांनी त्यांच्याकडून मला काय मिळेल याचा कधीही विचार केला नाही, तर कायम मला त्यांना काय देता येईल याचा विचार केला. दोन्ही भावांमधील हे नातं शेवटपर्यंत कायम राहिले आणि आता पुतण्यांनाही ते साथ देत असल्याचे रितेश देशमुख म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -