घरताज्या घडामोडीPM Modi Dehradun Visit: पंतप्रधान मोदी आज देहरादून दौऱ्यावर, १८ कोटी रुपयांच्या...

PM Modi Dehradun Visit: पंतप्रधान मोदी आज देहरादून दौऱ्यावर, १८ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे करणार उद्घाटन

Subscribe

दुपारी १ वाजता मोदींच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जाईल.

पंतप्रधान मोदी आज उत्तराखंडची राजधानी देहरादून दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदी १८ करोड रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. मोदी आज दुपारी १२:२५ वाजता देहरादूनच्या जॉली ग्रॉट एअरपोर्टवर पोहचतील आणि तिथून ते हेलिकॉप्टरने १२:५० ला परेड ग्राउंडवर पोहचतील. त्यानंतर दुपारी १ वाजता मोदींच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जाईल. याचदरम्यान पंतप्रधान मोदी देशवासियांनी संबोधित देखील करणार आहेत.

- Advertisement -

मोदींच्या आजच्या संपूर्ण कार्यक्रमात रस्त्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्याचप्रमाणे प्रवास सुलभ आणि मुख्य म्हणजे सुरक्षित करण्यासाठी अनेक प्रकल्प आणले जात आहेत. या प्रकल्पांमुळे देशातील पर्यटन वाढण्यास चालना मिळणार आहे. आज पंतप्रधान मोदी ११ विकास कामांच्या प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.

या विकास कामांच्या उद्घाटनामध्ये ८,३०० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या दिल्ली डेहराडून इकॉनॉमिक कॉरिडॉरचा देखील समावेश आहे. या दिल्ली डेहराडून इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे दिल्ली डेहराडूनचा सहा तासांच्या प्रवासाचा वेळ वाचून केवळ अडीच तासांवर येणार आहे. यात हरिद्वार ,मुझफ्फरनगर,शामली,यमुनानगर,बागपत ,मेरठ आणि बरौत यांच्या कनेक्ट होण्यासाठी सात प्रमुख इंटरचेंज करण्यात येणार आहे. यात वन्यजीवांसाठी आशिया खंडातील सर्वात मोठे वन्यजीव कॉरिडॉर असेल.

- Advertisement -

त्याचप्रमाणे डेहाराडूनच्या दत्त काली मंदिराजवळ ३४० मीटरचा बोगदा करण्यात येणार आहे ज्यामुळे वन्यजीवांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे दिल्ली डेहराडून इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये ५०० मीटरचे अंतर आहे या अंतरातील पावसाचे पाणी साठवण्यासाठी ४०० हून अधिक वॉटर रिचार्जची व्यवस्था करण्यात येणार आहे.


हेही वाचा – आंदोलनातील शहीद शेतकर्‍यांची यादी आम्ही देतो

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -