घरदेश-विदेशडोनाल्ड ट्रम्प विरोधात महिलांचे टॉप लेस आंदोलन

डोनाल्ड ट्रम्प विरोधात महिलांचे टॉप लेस आंदोलन

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. पॅरिस मधील इलिसिस येथे तीन महिला आंदोलकांनी आपले कपडे काढून ट्रम्प यांचा विरोध केला. ट्रम्प यांच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न करत असलेल्या या महिलांना अटक करण्यात आली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान त्यांच्या गाड्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. फ्रान्स पोलिसांनी रविवारी तीन महिला आंदोलकांना अटक केली आहे. या महिला टॉपलेस होऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलन करत असल्यामुळे ही अटक करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प हे खोटे शांततेचे दूत असल्याच्या घोषणा या महिलांनी केल्या. पॅरिस मधील इलिसिस येथे ही घटना घडली. या घटनेनंतर ट्रम्प यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची निंदा ट्रम्प यांनी आपल्या भाषणात केली. मात्र ट्रम्प हे शांततेचे दूत नसून वॉर क्रिमिनल(war criminal) आहेत असा आरोप आंदोलक महिलांनी केला.

कसा घडला प्रकार

पहिले विश्वयुद्ध विराम दिवसा निमित्त फान्समध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध देशाच्या अध्यक्षांना बोलावण्यात आले. भारतातकडून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. फ्रान्सच्या राष्ट्रपतीकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जात असताना एक महिला आंदोलक टॉपलेस होऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाडीसमोर आली. तिने गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तिला आवरले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. फॉन्समध्ये दहशतवादी हल्लयानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -