घरCORONA UPDATEसहा बँकांचे ४०० कोटी रुपये घेऊन व्यापारी परदेशात फरार

सहा बँकांचे ४०० कोटी रुपये घेऊन व्यापारी परदेशात फरार

Subscribe

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीनुसार, सीबीआय ने कंपनीचा मालिक आणि चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय बँकेतून कोट्यवधी रुपये घेऊन परदेशात पलायन करणाऱ्यांची संख्या अलीकडे जास्तच वाढत आहे. आता यात बासमती तांदळाचा व्यापार करणारी कंपनी रामदेव इंटरनॅशनल लिमिटेडच्या मालकाच्या नावाचाही समावेश झाला आहे. दिल्लीमध्ये राहणाऱ्या या कंपनीच्या मालकाने एसबीआय आणि काही दुसऱ्या बँकेतून जवळपास ४०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु गेल्या चार वर्षांपासून त्याची कोणतीही तक्रार नव्हती. आता असे सांगण्यात येत आहे की, कंपनीचा मालक विदेशात पळून गेला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीनुसार, सीबीआय ने कंपनीचा मालिक आणि चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या तपासा दरम्यान, या व्यक्तीने सहा बँकेकडून उधार घेतले असून हा २०१६ पासून गायब आहे.

२०१६ साली कंपनीला एनपीए घोषित केले आहे. चार वर्षे उलटून गेली.फेब्रुवारी एसबीआयतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २८ एप्रिल रोजी सीबीआयने एफआईआर दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, रामदेव इंटरनॅशनलने एकूण ४१४ कोटी रुपये बँकेकडून उधार घेतले होते. यामध्ये १७३.११ कोटी रुपये एसबीआयकडून, कॅनडा बँकेकडून ७६.०९ कोटी, यूनियन बँक ऑफ इंडिया मधून ६४.३१ कोटी, ५१.३१ कोटी रुपये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ३६.९१ कोटी रुपये कॉर्पोरेशन बँक आणि १२.२७ कोटी रुपये आयडीबीआय बँकेतून घेऊन फरार झाला आहे.

- Advertisement -

सीबीआयने कंपनी आणि सहसंचालक नरेश कुमार, सुरेश कुमार, संगीत आणि काही अज्ञात सरकारी अधिकाऱ्यां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एनडीटीव्हीला एसबीआयकडून तक्रार पत्र प्राप्त झाले आहे. यात सांगितले की, कंपनीला एनपीएमध्ये टाकण्यात आले आहे. एसबीआयने सांगितल्यानुसार, २०१६ साली केलेल्या ऑडिटमध्ये निदर्शनास आले की, आरोपीने खात्यात गडबड केली, बँलेन्सशीटमध्ये घोटाळा आणि बेकायदेशिररित्या प्लांट व मशीन हटविण्यात आल्या. कारण बेकायदा पद्धतीने बँकेतील फंडामध्ये सूट मिळेल. त्यानंतर बँकेने तपासणी केल्यावर कंपनीचे सदस्य फरार झाल्याचे समजले आणि देश सोडून परदेशात पलायन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -