घरदेश-विदेशलॉकडाऊन आंबटशौकिनांच्या पथ्यावर; पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये झाली वाढ!

लॉकडाऊन आंबटशौकिनांच्या पथ्यावर; पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये झाली वाढ!

Subscribe

या पाहणीत भारतात पॉर्न बघणाऱ्यांच्या प्रमाणात ९५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहीती समोर आली आहे

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र कोरोनाचा प्रसार वेगानं होत असल्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन असल्याने सर्वच लोकं घरी राहणं पसंत करत असले तरी अधिकाधिक लोकं सोशल मीडियावर आपला वेळ घालवताना दिसताय. लॉकडाऊनमुळे सगळंच बंद असल्याने लॉकडाऊन दरम्यान पॉर्न बघणाऱ्या भारतीयांचं प्रमाण मोठया प्रमाणात वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पॉर्न बघणाऱ्यांच्या प्रमाणात ९५ टक्क्यांनी वाढ

मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाईन पॉर्न बघणाऱ्यांसंदर्भात लॉकडाऊनच्या काळात भारतात एक पाहणी करण्यात आली असून या पाहणीतून असे समोर आले की, भारतात पॉर्न बघणाऱ्यांच्या प्रमाणात ९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये मोबाईलवरून थेट साईटवर जाऊन पॉर्न बघणाऱ्या भारतीयांची संख्या ८९ टक्के आहेत तर ३० ते ४० टक्के भारतीय पॉर्न ग्राहक हे व्हिडीओ डाऊनलोड करून पाहत असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

लैगिंक शोषणाच्या घटनांना प्रोत्साहन?

दरम्यान केंद्र सरकारनं ३,५०० पॉर्न साईट बंद केल्यानंतर ही आकडेवारी केलेल्या पाहणीतून समोर आली आहे. केंद्र सरकारनं कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला त्यानंतर दोन वेळ लॉकडाऊनचा कालावधी देखील वाढवण्यात आला. मात्र या काळात सगळंचं ठप्प असलं तरी लैगिंक शोषणाच्या घटनांना प्रोत्साहन देत असणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे.


Lockdown: चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या मागणीत वाढ; महाराष्ट्रात १३० गुन्हे दाखल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -