घरताज्या घडामोडीधक्कादायक! मध्य प्रदेशात दलित कुटुंबातील 3 जणांची गोळ्या झाडून हत्या

धक्कादायक! मध्य प्रदेशात दलित कुटुंबातील 3 जणांची गोळ्या झाडून हत्या

Subscribe

मध्य प्रदेशातील दमोह येथे दलित कुटुंबातील तीन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मध्य प्रदेशातील दमोह येथे दलित कुटुंबातील तीन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. परस्पर वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (triple murder dalit family woman molestation dispute damoh police madhya pradesh)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना देवरान गावातील आहे. या ठिकाणी एका महिलेच्या विनयभंगावरून पटेल आणि अहिवाल कुटुंबात वाद झाला. हे प्रकरण इतके चिघळले की मंगळवारी दलित कुटुंबातील काही लोकांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात विनयभंगाचा आरोपी मानक अहिवाल (30), त्याचे वडील घमदी अहिवाल (60) आणि आई राजप्यारी (58 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कुटुंबातील आणखी एका सदस्याला गोळी लागली असून, त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली, जिल्हाधिकारी एस कृष्ण चैतन्य आणि एसपी डीआर तेनिवार यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. सुरक्षेच्या दृष्टीने गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता, प्राथमिक तपासात महिलेच्या विनयभंगावरून वाद झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर हे हत्याकांड घडवण्यात आले. याप्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली असून काही फरार आहेत. त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी चैतन्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांव्यतिरिक्त महसूल पथकही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल १७ वर्षे बंद होता ‘हा’ तरुण, दिवाळीच्या दिवशी परतला घरी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -