घरठाणेमुख्यमंत्र्यांकडून भाऊबीजेची भेट; आशा स्वयंसेविकांना मिळाले सानुग्रह अनुदान

मुख्यमंत्र्यांकडून भाऊबीजेची भेट; आशा स्वयंसेविकांना मिळाले सानुग्रह अनुदान

Subscribe

ठाणे महापालिका क्षेत्रातील आशा सेविका यांच्या शिष्टमंडळाने ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटसुद्धा घेतली होती.

आरोग्य क्षेत्रात आशा स्वयंसेविका यांचे खूप मोठे योगदान आहे. हेच योगदान लक्षात घेऊन आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आशा स्वयंसेविकांना पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दिले. मुख्यमंत्र्यांनी रविवारी हे आदेश दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून मंगळवारी दुपारी 34 आशा स्वयंसेविका यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा स्वयंसेविकांना अभाऊबीजेची भेट दिली असं सुद्धा बोललं जात आहे. (The Chief Minister of the state Eknath Shinde ordered the Thane Municipal Administration to give a grant of five thousand rupees to Asha volunteers.)

हे ही वाचा –  ठाकरेंच्या वक्तव्यावर शेतकरी हसत होते, चंद्रकांत पाटलांची टीका

- Advertisement -

दरम्यान ठाणे महापालिका क्षेत्रातील आशा सेविका यांच्या शिष्टमंडळाने ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटसुद्धा घेतली होती. दरम्यान या शिष्टमंडळाने सानुग्रह अनुदानासाठी काही मागण्या मांडल्या होत्या त्यावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे घोषीत केले. त्याचबरोबर ते अनुदान तत्काळ देण्यात यावे असे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दिले. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना संबंधित सूचना दिल्या आणि आशा स्वयंसेविकांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरु केली.

मंगळवारी या सर्व आशा सेविकांना अनुदानाची रक्कम देण्यात आली. आशा स्वयंसेविकांना पहिल्यांदाच सानुग्रह अनुदान मिळाले आहे. 354 पैकी 14 आशा स्वयंसेविकांना धनादेशाच्या माध्यमातून सानुग्रह अनुदान देण्यात आले. तर, 340 आशा स्वयंसेविकांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्यात आले. ही सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली ही समाधानाची बाब आहे असंही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

- Advertisement -

हे ही वाचा – फडणवीस फार कमी रागावतात, पण कधी-कधी पारा चढतो कारण…

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -