घरदेश-विदेशनदीत बुडालेली गाडी पाच दिवसानंतर चुंबकाच्या सहाय्याने बाहेर

नदीत बुडालेली गाडी पाच दिवसानंतर चुंबकाच्या सहाय्याने बाहेर

Subscribe

आसाम राज्यातील दिखो नदीत अपघात झालेली कार तब्बल पाच दिवसानंतर मिळाली. एका चुंबकाच्या सहाय्याने या गाडीला पाण्याच्या बाहेर काढण्यात आले.

आसाम राज्यात पाच दिवसांपूर्वी नदीत बुडालेल्या एका गाडीला अथक परिश्रमानंतर नदीबाहेर काढण्यात आले आहे. आसामच्या शिवसागर जिल्ह्यात ही बोट बुडाली होती. बचाव कार्य करणाऱ्या पथकाने बुधवारी वीस किलो चुंबकाच्या सहाय्याने ही गाडी अखेर बाहेर काढली. या गाडीमध्ये एकाच कुटुंबातील पाच लोकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेहही बाहेर काढले आहेत. ज्या ठिकाणी अपघात झाला त्याठिकाणाहून ३०० मीटर लांबीवर ही गाडी मिळाली आहे.

मागच्या आठवड्यात शनिवारी दिखो नदीचा कठडा तोडून ही गाडी नदीत बुडाली होती. तेव्हापासूनच गाडीतील पाचही नागरिक बेपत्ता होते. आसाम राज्याचे आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) तसेच सैन्यदल आणि नौदलाचे जवान गाडी शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.

- Advertisement -

पाच दिवसानंतरही बुडालेली गाडी मिळत नसल्यामुळे दिब्रुगड जिल्ह्यातून हे २० किलोचे चुंबक मागवण्यात आले. चुंबकाच्या सोबत नदीत शोधकार्य करत असताना चुंबकाने गाडीचा शोध घेतला. एसडीआरएपचे जवान प्रांजल डोल यांना चुंबकाच्या शेजारी गाडीचे टायर आणि इतर सुटे भाग आढळून आले असल्याची माहिती, एसडीआरएफचे प्रमुख जीतेन डोल यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

गाडीला दोर बांधून नदीच्या बाहेर काढण्यासाठी बचाव टीमला तब्बल दोन तासांचा वेळ लागला, यावरून या अपघाताची तीव्रता कळते. गाडी बाहेर काढल्यानंतर गाडीतच पाचही जणांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. मृत झालेले पाचही एकाच कुटुंबातील होते. गुवाहाटीचे व्यापारी हरेन बोरा (५२), त्यांची पत्नी फुनू बोरा (४५), मुलगी सीम्पी बोरा (२२) आणि मुन्मी बोरा (१८) आणि हरेन यांच्या मातोश्री पोनऊ बोरा (८६) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व शिवसागर येथून गुवाहाटीला जात होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -