घरमुंबईखुशखबर! एसटीच्या ताफ्यात ५०० बसेसचा समावेश होणार

खुशखबर! एसटीच्या ताफ्यात ५०० बसेसचा समावेश होणार

Subscribe

तोट्यात चालणाऱ्या एसटीच्या ताफ्यात नवीन ५०० बस खरेदी करण्याचा विचार सरकार करत असून त्यासाठी राज्य सरकारडून निधी देण्यात येणार आहे.

लालपरी… ग्रामीण भागात गावागावात पोहोचलेली अशी ही लालपरी. मात्र गेल्या काही वर्षांत ही लालपरी अक्षरशः तोट्यात सुरू आहे. मात्र, आता या लालपरीला अच्छे दिन येणार आहेत. कारण तोट्यात चालणाऱ्या या ललापरीच्या ताफ्यात नवीन ५०० बस खरेदी करण्याचा विचार करत असून आता या नव्या कोऱ्या ५०० बसेस खरेदी करण्यासाठी राज्य सरकारडून निधी देण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.  त्यामुळे एसटीच्या ताफ्यात ५०० नवीन बसेसचा समावेश होणार आहे.

…म्हणून राज्य सरकारकडून मदत

एसटी बस ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सर्वसामान्य नागरिक या बसमधून प्रवास करत असतात. त्यांचा हा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला नवीन ५०० बसेस खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देणार, अशी माहीती मुंनगटीवार यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत दिली.

- Advertisement -

काय म्हणालेत नेमकं अर्थमंत्री

बस खरेदीसाठी लागणाऱ्या निधीपैकी १२.५ कोटी रुपयांचा निधी नजीकच्या काळात तर उर्वरित निधी हा विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच आज एसटी बस ही ग्रामीण महाराष्ट्राचा आधार आहे. सर्वसामान्य माणसांची ही गरज लक्षात घेऊन त्यांना चांगल्या एसटी बसमधून प्रवास करता यावा हा त्यामागचा उद्देश असल्याचे देखील ते म्हणालेत. त्याच बरोबर महामंडळाने ही पुढाकार घेऊन एसटी बस स्थानकं सुंदर आणि स्वच्छ ठेवावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बैठकीत घेतला ‘या’ स्थानकांचा आढावा

या बैठकीत त्यांनी वर्धा, देवळी, सेलू, वडसा, गडचांदूर, कोरपना, नागभीड, चंद्रपूर, मूल, बल्लारपूर, सावली, पोंभूर्णा, घुग्गूस, भद्रावती, राजूरा, चिमूर बस स्थानकांच्या कामांचाही आढावा घेतला. यावेळी वर्धा, देवळी, मूल, बल्लारपूर, सावली, पोंभूर्णा, घुग्गुस, भ्रदावती, राजूरा चिमूर बसस्थानकाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यापैकी चंद्रूपर, मूल, बल्लारपूर बस स्थानकांच्या कामाचे कार्यादेशही देण्यात आले आहेत. उर्वरित स्थानकांच्या कामांनाही गती देण्यात यावी, ज्या कंत्राटदारांना बसस्थानकांची कामे देण्यात आली आहेत, त्यांच्याकडून स्थानकांच्या विकासाचे काम वेळेत आणि दर्जात्मक पद्धतीने करून घेण्यात यावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -