घरदेश-विदेशअमेरिकेच्या अलास्कामध्ये दोन विमानांची टक्कर; ५ जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या अलास्कामध्ये दोन विमानांची टक्कर; ५ जणांचा मृत्यू

Subscribe

अग्नेय अलास्कामधील केटचिकान या शहरामध्ये फ्लोट विमानाला अपघात झाला आहे. पाण्यावर उडणारी ही दोन्ही विमानं प्रवाशांना घेऊन जात होती.

अमेरिकेच्या अलास्कामध्ये दोन फ्लोट विमानाची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये ५ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून १ जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही विमानांमधून १६ जण प्रवास करत होते.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अग्नेय अलास्कामधील केटचिकान या शहरामध्ये फ्लोट विमानाला अपघात झाला आहे. पाण्यावर उडणारी ही दोन्ही विमानं प्रवाशांना घेऊन जात होती. दोन्ही विमानांची हवेमध्ये समोरा समोर टक्कर झाली. या अपघातामध्ये विमानातील ५ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर एक जण बेपत्ता असून त्याचा शोध सुरु आहे. तर जखमी झालेल्या १० प्रवाशांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र या घटनेचा तपास सध्या सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -