घरमुंबईएचआयव्हीग्रस्त महिलेवर सायन हॉस्पिटलमध्ये बलात्कार

एचआयव्हीग्रस्त महिलेवर सायन हॉस्पिटलमध्ये बलात्कार

Subscribe

पीडित महिला एचआयव्हीग्रस्त आहे

पुण्यातील एका खेड्यातून मुंबईच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलात उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी सायन पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून धारावीत राहणार्‍या ३१ वर्षीय इसमाला अटक केली आहे. या घटनेमुळे हॉस्पिटलात उपचारासाठी दाखल असणार्‍या रुग्णाच्या महिला नातेवाईकांच्या सुरक्षिततेच प्रश्न निर्माण झाला आहे. पीडित महिला ही एचआयव्हीग्रस्त आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला ही ३७ वर्षांची असून ती पुण्यातील एका खेड्यात राहणारी आहे, गरीब कुटुंबातील ही पीडित महिला तिच्या लहान बहिणीला घेऊन उपचारासाठी सायनच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलात काही दिवसांपूर्वीच आली होती. पीडित महिलेच्या बहिणीला किडनीचा त्रास असल्यामुळे तिच्यावर हॉस्पिटलात उपचार सुरु होते. दरम्यान हॉस्पिटलाच्या आवारात फिरणार्‍या धारावीतील ३१ वर्षीय इसमाने पीडित महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिला मदत करण्याच्या नावाखाली तिच्यासोबत ओळख वाढवली. येथील डॉक्टर आणि कर्मचार्‍यासोबत आपली ओळख असून बहिणीवर चांगला उपचार करून देऊ असे सांगितले. दरम्यान शनिवारी भरदुपारी ३१ वर्षीय इसमाने या पीडित महिलेला हॉस्पिटलच्या ओपीडी इमारतीच्या छतावर आणून तिच्यावर बलात्कार केला असल्याची तक्रार पीडित महिलेने सायन पोलीस ठाण्यात दिली असल्याची माहिती सायन पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी दिली. या घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या घटनेतील पीडित महिला हि एचआयव्ही पॉझीटीव्ह असून अटक आरोपीला याबाबत कुठलीही कल्पना नव्हती असे समजते. याबाबत पोलिसांनी आरोपीला याबाबत काही माहिती दिलेली नाही.

- Advertisement -

या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात या इसमांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या इसमाला रविवारी अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता गायकवाड यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपीला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली असून या गुन्ह्याच्या अधिक तपास करण्यासाठी या इसमाला पोलीस कोठडीत घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याचे समजते. अटक करण्यात आलेला आरोपी हा धारावीत राहणारा भुरटा चोर असून हॉस्पिटलात छोट्या-मोठ्या चोर्‍या करण्यासाठी येत असतो, त्याच बरोबर हॉस्पिटलात दाखल असलेल्या गरीब रुग्णाच्या नातेवाईकांचा असहाय्यतेचा फायदा उचलून त्यांची फसवणूक करायचा.

यासंदर्भात आमच्याकडे कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नाही. परंतु अशा प्रकारची कोणतीही तक्रार आल्यास त्याची योग्य ती दखल घेतली जाईल. दरम्यान, हॉस्पिटलच्या आवारात अशा प्रकारची घटना होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलात येणार्‍या कुठल्याही व्यक्तीच्या भुलथाप्यांना बळी पडू नये, तसेच या व्यक्तीसोबत कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये. या घटनेची गंभीरता बघून यापुढे सुरक्षेची काळजी घेऊन हॉस्पिटलातील इमारतीच्या टेरेसला कुलूप लावण्यात येथील तसेच हॉस्पिटलांची अतंर्गत सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात येईल. – जयश्री मोंडकर, अधिष्ठाता, लोकमान्य टिळक हॉस्पिटल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -