घरदेश-विदेशधक्कादायक! एकाच रुग्णात आढळले दोन कोरोना स्ट्रेन

धक्कादायक! एकाच रुग्णात आढळले दोन कोरोना स्ट्रेन

Subscribe

जगात पहिल्यांदाच एकाच रुग्णामध्ये दोन प्रकारचे कोरोना स्ट्रेन

जगभरासह देशावर ओढावलेले जीवघेण्या कोरोनाचे संकट पूर्णतः नष्ट झालेले नाही. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू असली तरी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जगात पहिल्यांदाच एकाच रुग्णामध्ये दोन प्रकारचे कोरोना स्ट्रेन आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार ब्राझील येथील तपासणीदरम्यान उघड झाला असून कोरोनाची लागण झालेल्या दोन व्यक्तींमध्ये एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कोरोनाच्या स्ट्रेनची लागण झाल्याचे समोर आले आहे.

ब्राझील येथे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना ब्राझीलच्या feevale univercity च्या संशोधकांनी एक संशोधन केले. यावेळी संशोधकांनी ९० कोरोनाबाधितांच्या नमुन्यांचा अभ्यास केला. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. डेलीमेलने दिलेल्या बातमीनुसार, या दोन्ही रूग्णांचे स्वॅब हे ब्राझिलच्या रिओ ग्रांडे सुल या शहरातून घेण्यात आले. त्या दोघांना वेगवेगळे नाव देऊन त्यांना अभ्यासले गेले. पहिला नमुन्यावर खूप घातक तर दुसऱ्यावर कोरोना लसीचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे समोर आले. दरम्यान पहिला नमुन्यावर कोरोना लसीचा परिणाम कमी प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

या संदर्भात लंडनचे फ्रांन्सिस क्रिक इन्स्टिट्यूट वर्ल्डवाईड इंफ्लूएंझा सेंटरचे संचालक डॉ. जॉन मॅक्युले यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले एकाच वेळी रूग्णाला दोन कोरोना स्ट्रेनची लागण होऊ शकते. यासोबत दोन्ही कोरोना स्ट्रेन एकमेकांसह लढून त्यांच्या जेनेटीक कोडमध्ये बदल होऊ शकतो, असाही इशारा त्यांनी दिला. ब्राझीलच्या या संशोधनाचा अहवाल अद्याप कुठेही सादर झालेला नाही. तसेच कोणत्याही संशोधकांनी यासंदर्भातील अभ्यास केलेला नाही. या कोरोनाचे को इन्फेक्शन नवी कोरोना व्हेरिअंटला जन्म देऊ शकतो, आणि हा खूपच घातक ठरू शकतो. दरम्यान ब्राझीलमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू असून तेथील परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीत जर हे संशोधन खरं ठरलं तर कोरोना व्हायरसचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -