घरताज्या घडामोडी...आणि महिला आमदाराने तरुणाच्या कानफडात लगावली

…आणि महिला आमदाराने तरुणाच्या कानफडात लगावली

Subscribe

आमदाराकडे पाहून एक व्यक्ती करत होता अश्लील चाळे

महिला आमदार विधानसभा मतदारसंघातील गावात क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन करण्यसाठी गेल्या होत्या. यावेळी व्यासपीठावर असताना समोर बसलेला व्यक्ती महिला आमदाराकडे पाहून अश्लिल चाळे करत होता. महिला आमदाराने पहिले या व्यक्तीच्या कृत्याकडे दुर्लक्ष केले परंतु या व्यक्तीच्या अश्लील चाळे करण्याचे प्राण वाढतच गेले. त्यामुळे महिला आमदाराने व्यासपीठावरुन उतरुन त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावली आहे. युवकाच्या अश्ली कृत्याला पाहून संताप आल्याने कानाखाली मारल्याचे या महिला आमदाराने सांगितले आहे. तसेच या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचेही आमदारांनी म्हटले आहे.

बिहारमध्ये महिला आमदाराला एका गावात क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनासाठी बोलावण्यात आले होते. या सामन्याच्या उद्घाटनावेळी महिला आमदारा व्यासपीठावर बसल्या होत्या, त्यांच्याबरोबर एक पुरुष आमदारही उपस्थित होता. महिला आमदाराकडे पाहून एक व्यक्ती अश्लील चाळे करत होता. सुरुवातील अश्लील चाळे करणाऱ्या व्यक्तीकडे महिला आमदाराने दुर्लक्ष केले. परंतु आपण दुर्लक्ष केल्यामुळे त्या व्यक्तीने अश्लील चाळे करण्याची हद्दपार केली. यामुळे संतापलेल्या महिला आमदाराने तरुणाच्या कानशिलातच लगावली आहे.

- Advertisement -

व्यासपीठावर उपस्थित पुरुष आमदाराने प्रकरण दडपण्यासाठी महिला आमदारावर यावेळी दबाव टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला आमदाराने हात उगारल्यामुळे कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण तरुणाच्या कानाखाली मारली आहे. अशा प्रकारच्या घटनांना वेळीच रोखले नाही तर सगळ्याच व्यक्तींची हिंमत वाढेल. त्यामुळेच आपण हे पाऊल उचलले असल्याचेही महिला आमदाराने म्हटले आहे. तसेच या व्यक्तीविरोधात पोलीस अधीक्षकांना भेटून तक्रार देणार असल्याचे महिला आमदाराने म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -