घरदेश-विदेशनव्या वर्षातील दूरस्थ शिक्षणासाठी यूजीसीने मागवले प्रस्ताव

नव्या वर्षातील दूरस्थ शिक्षणासाठी यूजीसीने मागवले प्रस्ताव

Subscribe

नव्या शैक्षणिक वर्षांमध्ये दूरस्थ व मुक्त शिक्षण आणि ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पात्र असलेल्या शैक्षणिक संस्थांकडून विद्यापीठ अनुदान आयोगाने नवे प्रस्ताव मागवले आहेत.

जानेवारी २०२१ पासून २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. नव्या शैक्षणिक वर्षांमध्ये दूरस्थ व मुक्त शिक्षण आणि ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पात्र असलेल्या शैक्षणिक संस्थांकडून विद्यापीठ अनुदान आयोगाने नवे प्रस्ताव मागवले आहेत. त्यामुळे नोकरी करून शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणखी संस्था उपलब्ध होतील. 
 
नोकरी व व्यवसाय करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ व मुक्त शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु असे शिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. यासाठी गतवर्षीपासून यूजीसीमार्फत जूनप्रमाणेच जानेवारीपासून दुसरे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यात आले आहे. यालाही विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये वाढ व्हावी या अनुषंगाने यूजीसीने दूरस्थ व मुक्त शिक्षण आणि ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी काही संस्थाना मान्यता दिली आहे. मान्यता दिलेल्या या नव्या शैक्षणिक संस्थांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. ऑनलाईन पोर्टलच्या माध्यामातून हे प्रस्ताव यूजीसीला १५ ऑक्टोबरपर्यंत सादर करायचे आहेत. त्याचप्रमाणे प्रस्तावाची एक प्रत टपालाने नवी दिल्लीच्या कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवण्याच्या सूचना यूजीसीने केल्या आहेत. हे प्रस्ताव ऑनलाईन अर्ज केल्यानंतर १० दिवसांत पोहोचणे आवश्यक आहे. 
 
त्याचप्रमाणे ज्या कॉलेज, शैक्षणिक संस्थाना यापूर्वी मान्यता मिळालेली आहे, ते सुद्धा जानेवारी २०२१ पासून सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करू शकतात असेही यूजीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दूरस्थ व मुक्त शिक्षण आणि ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती यूजीसीच्या https://www.ugc.ac.in/deb या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -