घरट्रेंडिंगUGC Recruitment 2021: कनिष्ठ सल्लागार पदासाठी भरती, ६० हजारांपर्यंत पगार; असा करा...

UGC Recruitment 2021: कनिष्ठ सल्लागार पदासाठी भरती, ६० हजारांपर्यंत पगार; असा करा अर्ज

Subscribe

डिस्टेन्स एज्यूकेशन ब्यूरोच्या विविध कामांसाठी विश्वविद्यालय अनुदान आयोगने (यूजीसी) कनिष्ठ सल्लागारांच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार केवळ १२ जुलै २०२१ रोजी किंवा त्यापूर्वीच ऑनलाइन पदांसाठी अर्ज करू शकतात. ही भरती करार तत्त्वावर केली जाणार असल्याची दखल इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी घ्यावी, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे. या पदांवर अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहेत. उमेदवारांना आपला अर्ज १२ जुलै पर्यंतच करता येणार आहे.

डिस्टेन्स एज्यूकेशन ब्यूरोच्या विविध कामांसाठी विश्वविद्यालय अनुदान आयोगने प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीनुसार, कनिष्ठ सल्लागारांच्या पदासाठी केवळ ८ जागा आहेत. निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ५० ते ६० हजार रुपये पगार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

या पदाकरता आवश्यक शैक्षणिक पात्रता

अर्ज केलेल्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी किमान ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. यासह, डिस्टेन्स ऑनलाइन मोड एज्यूकेशनची डिस्टेंस एजुकेशन आणि ऑनलाइन शिक्षणाबद्दलचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे. या व्यतिरिक्त एमएस ऑफिस / एक्सेल / इंटरनेट आणि संगणकांची चांगली समज असणे आवश्यक आहे.

वयांची मर्यांदा

अर्ज केलेल्या उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक आणि पात्र उमेदवार युजीसीच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच ugc.ac.in वर १२ जुलै २०२१ रोजी किंवा त्याआधी नोंदणी करू शकतात. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.


भारताच्या चुकीच्या नकाशावरून वाद; Twitter च्या MD मनीष माहेश्वरी यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -