घरताज्या घडामोडीभारताच्या चुकीच्या नकाशावरून वाद; Twitter च्या MD मनीष माहेश्वरी यांच्या विरोधात गुन्हा

भारताच्या चुकीच्या नकाशावरून वाद; Twitter च्या MD मनीष माहेश्वरी यांच्या विरोधात गुन्हा

Subscribe

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात तणाव आणखी वाढला आहे. दरम्यान, ट्विटरने आपल्या वेबसाइटवर दाखविलेल्या भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखचा समावेश नाही. ट्विटरने जम्मू-काश्मीर आणि लडाखला आपल्या वेबसाइटवर दोन स्वतंत्र देश म्हणून दाखवले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘ट्विटर’ने आपल्या वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याचे समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशात ‘ट्विटर इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बजरंग दलाच्या एका नेत्याच्या तक्रारीवरून बुलंदशहरात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यानंतर, ट्विटरने हा चुकीचा नकाशा काढून टाकला आहे. ‘ट्विटर इंडिया’च्या व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ५०५ (२) आणि आयटी अधिनियम २००८ च्या कलम ७४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

असं आहे वादग्रस्त नकाशा प्रकरण

दरम्यान, ट्विटरच्या करिअर पेजवरील Tweep Life सेक्शनमध्ये एक जागतिक नकाशा आहे, जगभरात ट्विटरच्या टीमचे लोकेशन्स याद्वारे कंपनीकडून दर्शवले जातात. या नकाशात भारताचाही समावेश आहे. परंतु भारताचा नकाशा विवादित म्हणून दर्शविला गेल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ही चूक सुधारण्यात आली. ट्विटरने भारताच्या नकाशावर चुकीची भूमिका दाखवण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही लडाख भारताहून वेगळा करून दर्शवण्यात आला होता. यानंतर हा नकाशा सुधारल्याचे सांगण्यात आले होते.

- Advertisement -

ट्विटर विरुद्ध केंद्र सरकारमध्ये वाद

गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार असा वाद होत असताना पाहायला मिळत आहे. त्यातच ट्विटरने भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याने आणखी एका नव्या वादाला तोंड फुटल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही ट्विटरने अशीच चूक केली होती व लेह हा चीनचा भाग असल्याचं सांगितलं होतं. तेव्हा केंद्र सरकारने ट्विटरला चांगलंच बजावले होते. त्यानंतर पुन्हा एकदा ट्विटरने त्याच चुकीची पुनरावृत्ती केली आहे.


प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांना धमकावत ५ कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न, एकाला अटक

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -