घरमहाराष्ट्रनाशिकसरकारी अनास्थेमुळे लसीकरण मोहिमेचा खेळखंडोबा

सरकारी अनास्थेमुळे लसीकरण मोहिमेचा खेळखंडोबा

Subscribe

लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांचा मनस्ताप

जिल्ह्याच्या काही भागात कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत तर नागरिकांचा प्रतिसाद नाही आणि काही ठिकाणी नागरिक स्वतःहून पुढे येत असताना लसीच उपलब्ध नसल्याचे विदारक चित्र आहे. सरकारी यंत्रणांचा अनास्था आणि असमन्वयामुळे लसीकरण मोहिमेच्या मूळ उद्देशालाच धक्का लागत असल्याचे चित्र आहे. शहरातही वेगवेगळ्या भागांत लसीकरणासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

शहरातील जुने नाशिक भागात असलेल्या रंगारवाडा शाळेतील लसीकरण केंद्रावरही नागरिकांनी सरकारी अनास्थेचा अनुभव घेतला. प्रभाग १३ मधील या केंद्रावरील ही गर्दी पाहता लसीकरणासाठी किती प्रतिसाद लाभतोय हे लक्षात येते. या ठिकाणी सकाळी सात-साडेसात वाजेपासून नागरिक रांगेत उभे राहतात. सोमवारी सकाळीही अशीच परिस्थिती होती. मात्र, लसीकरणाची गाडी ११ वाजेच्या सुमारास आली. त्यामुळे दोन ते तीन तास लोकांना ताटकळत उभे राहावे लागले. विलंबामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.अशीच परिस्थिती नवीन नाशिकमधील सावतानगर येथील केंद्रावर दिसून आली. या ठिकाणी लस घेण्यासाठी लांबवर रांगा लागत आहेत. महत्त्वाचे म्हणजे अनेक नागरिक हे गोरगरीब, कष्टकरी आणि रोजंदारीवर काम करणारे असतात. अधिक वेळ उभे राहावे लागत असल्याने त्याचा थेट परिणाम त्यांच्या रोजगारावर होतो. एवढे करुनही लस मिळेतच याची शाश्वती नसते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -