घरताज्या घडामोडीUkraine Satellite photos : युक्रेनची राजधानी कीवमध्ये ६४ किलोमीटरपर्यंत रशियाच्या सैन्याचा कब्जा,...

Ukraine Satellite photos : युक्रेनची राजधानी कीवमध्ये ६४ किलोमीटरपर्यंत रशियाच्या सैन्याचा कब्जा, रुग्णालयांसह घरांवर हल्ला

Subscribe

रशिया आणि युक्रेमध्ये सुरु असलेल्या युद्धा दरम्यानचा सॅटेलाईट फोटो व्हायरल झाला आहे. सॅटेलाईट फोटोमध्ये असा खुलासा झाला आहे की, युक्रेनची राजधानी असलेल्या कीवच्या उत्तरेमध्ये ६४ किलोमीटरपर्यंत रशियाच्या सैन्याने कब्जा केला आहे. एक दिवसांपूर्वी असे सांगण्यात येत होते की, रशियाच्या सैन्याचा ताफा २७ किलोमीटरपर्यंत पसरला आहे. रशियाकडून कीवने अनेक हल्ले झेलले आहेत यामध्ये आता आणखी हल्ल्यांचा सामना करत आहे. रशियाच्या सैन्याकडून घरांना आणि रुग्णालयांना निशाणा करण्यात येत आहे.

अमेरिकेची स्पेस टॅक्नॉलॉजी कंपनी मैक्सारद्वारे सॅटेलाईट फोटो जारी करण्यात आला आहे. या फोटोमध्ये असे दिसत आहे की, रशियाच्या सैन्याचा ताफा युक्रेन आणि राजधानी कीवच्या दिशेने जात आहे. अँटोनोव्ह विमानतळ ते प्रिबिर्स्क शहरापर्यंतचा रस्ता व्यापणारा रशिया सैन्याचा ताफा दिसत आहे. उत्तर आणि वायव्य दिशेला जिथून ताफा जातोय तिकडे अनेक घरे आणि इमारती जळत असल्याचे दिसत आहे. युक्रेनियन सीमेच्या उत्तरेस ३२ किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर दक्षिण बेलारूसमध्ये अतिरिक्त ग्राउंड फोर्स आणि ग्राउंड अटॅक हेलिकॉप्टर युनिट्स दिसले आहेत.

- Advertisement -

रशियाच्या सैन्याकडून युक्रेनमधील घरे आणि रुग्णलयांवर हल्ला करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शहरांतील मोठे मोठे रुग्णालये फायटर प्लेनच्या सहाय्याने निशाणा करुन उध्वस्त करण्यात येत आहेत. रशियाने व्हॅक्युम बॉम्बचा हल्ला केला असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

कीव सोडण्याचे भारतीयांना आदेश

युक्रेनची राजधानी कीवमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि तेथील भारतीय नागरिकांना कीव सोडण्याचे आवाहन भारतीय दूतावासाकडून करण्यात आले आहे. कीव आजच्या आज तात्काळ सोडावे असे भारतीय दूतावासाने जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये म्हटलं आहे. भारतीय नागरिकांनी रेल्वे, बस आणि मिळेल त्या वाहनाने युक्रेनच्या सीमेलगत असलेल्या देशात पोहोचावे तसेच तिकडून भारतात आणण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. भारत सरकाने ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना भारतात आणण्यासाठी वेगवेगळे सोशल मीडिया हँडल तयार केले आहेत. युक्रेन तसेच युक्रेन सीमेलगत असलेल्या देशात बचाव करण्यासाठी नंबर आणि माहिती प्रसारित केली आहे. भारताचे युक्रेनमध्ये जवळपास २० हजार नागरिक आणि विद्यार्थी अडकले आहेत. आतापर्यंत ४ हजार लोकांना भारतामध्ये सुखरुप आणण्यात यश आलं आहे. मंगळवारी १८२ भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन सातवे विमान भारतात परतले आहे.


हेही वाचा : Anantnag Cylinder Blast : अनंतनागमधील प्रसूती रुग्णालयात सिलेंडरचा स्फोट, 13 जण जखमी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -