घरमनोरंजनAdipurush Release Date : प्रभासचा आगामी चित्रपट 'आदिपुरुष' येणार 2023 मध्ये...

Adipurush Release Date : प्रभासचा आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’ येणार 2023 मध्ये भेटीला

Subscribe

हा चित्रपट हिंदू धर्म ग्नंथातील रामायणावर आधारित आहे, ज्यामध्ये प्रभास श्री रामांची भूमिका साकारणार असून रावणाची भूमिका सैफ अली खान साकारणार आहे. कृति सेनन ही सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

नवी दिल्लीः टॉलिवूडचा सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कृती सेनन यांचा आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली.

12 जानेवारी 2023 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, हा चित्रपट 3D स्वरुपात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांना मात्र याचा झटका बसणार आहे. कारण आदिपुरुष चित्रपट 11 ऑगस्ट 2022 या दिवशी प्रदर्शित होणार होता, परंतु आमिर खानचा आगामी चित्रपट लाल सिंह चड्डांमुळे निर्मात्यांनी आदिपुरुष चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली.

- Advertisement -

चित्रपटासाठी प्रभासचं बजेट 350 कोटी ते 400 कोटींमध्ये

कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाचं नाव हिंदी चित्रपटांमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी प्रभासचं बजेट 350 कोटी ते 400 कोटींमध्ये आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि निर्माता भूषण कुमार हे मोठ्ठं काही तरी करण्याचं स्वप्न बघत आहेत. ओम राऊतद्वारा दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपटामध्ये प्रभास सोबतसह कलाकार म्हणून सैफ अली खान, कृती सेनन आणि सनी कौशा दिसून येतील. हा चित्रपट हिंदू धर्म ग्नंथातील रामायणावर आधारित आहे, ज्यामध्ये प्रभास श्रीरामांची भूमिका साकारणार असून, रावणाची भूमिका सैफ अली खान साकारणार आहे. कृती सेनन ही सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

अजय देवगण दिसणार महादेवांच्या भूमिकेत

या चित्रपटामध्ये अजय देवगणने रावणाची भूमिका साकारण्यासाठी नकार दिला, आदिपुरुष या चित्रपटामध्ये अजय देवगण श्रीरामांची भूमिका साकारण्यासाठी उत्सुक होते. परंतु माहितीनुसार अजय देवगण या चित्रपटात महादेवांच्या भूमिकेत दिसून येऊ शकतात.

- Advertisement -

प्रभासने घेतलं 100 कोटींपेक्षा जास्त मानधन

बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार प्रभासने या चित्रपटासाठी 150 करोडोंपेक्षा जास्त मानधन घेतलं आहे. गेल्या 10 वर्षांत प्रभास असा तिसरा अभिनेता आहे, ज्याने चित्रपटासाठी 100 करोडोंपेक्षा जास्त चार्ज घेतलं आहे.


हेही वाचाः Satya Nadella Son Died : मायक्रोसॉफ्टचे CEO सत्य नाडेला यांच्या मुलाचे निधन, जन्मापासून होता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -