घरमहाराष्ट्रRaj Thackeray : क्षणिक सत्तेची लाचारी म्हणावी की..., एनसीपी-एसपीचे राज ठाकरे यांच्यावर...

Raj Thackeray : क्षणिक सत्तेची लाचारी म्हणावी की…, एनसीपी-एसपीचे राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी राज्यात महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील महायुतीत सहभागी होत असल्याचे सांगितले जाते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (एनसीपी-एसपी) राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : जागावाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच उतावळे इच्छुक स्वत:च चढले उमेदवारीच्या बोहल्यावर

- Advertisement -

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एनसीपी-एसपीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वारंवार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीय राजकारणाला सुरुवात झाली. शरद पवार यांनी कधीही शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही. मुस्लीम मते जाण्याची भीती वाटल्यानेच इतर टोळ्या उभ्या करण्यात आल्या. त्यातून फंडिग गोळा करण्यात आले. 1999पासून हे विष राज्यात कालवले गेले, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले होते. त्यावरूनच राज ठाकरे यांची भाजपाशी जवळीक वाढल्याचे चित्र होते.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे असलेले मनसे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यातच आज, मंगळवारी राज ठाकरे यांनी दिल्लीत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे मनसेचा महायुतीमधील सहभाग जवळपास निश्चित झाल्याचे मानले जाते.

हेही वाचा – Thackeray group : …म्हणून ही वाट स्वीकारली, बाळासाहेबांच्या त्या वक्तव्यावर ठाकरे गटाचा खुलासा

याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने ट्वीट करत राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. रेल्वे इंजिनाची दुटप्पी भूमिका अखेर स्पष्टच झाली आहे. याला क्षणिक सत्तेची लाचारी म्हणावी की, ईडी चौकशांपासून वाचण्यासाठीची सावधगिरी…, असा टोलाही एनसीपी-एसपीने लगावला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : …तर ते महाराष्ट्रविरोधी, राऊतांकडून मनसेची एमआयएमसोबत तुलना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -