घरदेश-विदेशभारताला गरीब देश म्हणणाऱ्या पर्यटक महिलेने मागितली माफी

भारताला गरीब देश म्हणणाऱ्या पर्यटक महिलेने मागितली माफी

Subscribe

आपल्या खाजगी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून भारताला गरीब देश बोलणारी युएस पर्यटक महिलेने माफी मागितली आहे. तिने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट डिलिट करुन माफी मागितली आहे. आयफोन एक्स हरवला म्हणून भारतावर केली होती टीका.

भारतात दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. या पर्यटकांना आलेल्या अनुभवांबद्दल ते ब्लॉगवर लिहितात. काही पर्यटकांना भारतात चांगला तर काहींना वाईट अनुभव येतो. मात्र यासाठी देशाला कोणीही वाईट बोलत नाही. मात्र यु.के.तील एका महिला ब्लॉगरने भारतातला एक गरीब देश म्हटले होते. जयपूरला फिरण्यासाठी आलेल्या या महिला पर्यटकाचा “आयफोन एक्स”हरवला असल्यामुळे सोशल मीडियावर तिने अशा प्रकारची टीका केली होती. यानंतर नेटकऱ्यांकडून तिचा चांगलाच समाचार घेण्यात आला होता. काही वेळेनंतर या महिलेचा फोन परत केल्यांनतर अखेर या महिलेला आपल्या चुकीची जाणीव झाली. तिने नेटवर माफी मागत आपले अकाऊंट डिलिट केले.

पाच महिन्यांपूर्वी घेतलेला फोन हरवला

“मी पाच महिन्याअगोदर घेतलेला आयफोन एक्स हा फोन जयपूर येथे हरवला आहे. हो मी माझा फोन हरवला आहे जगातील सर्वात गरीब आणि गर्दी असलेल्या भारतात माझा फोन हरवला आहे. मी निराश झाली आहे. तो फोन विकून देशातील काही लोकांना जीवनात पूरतील इतके रुपये मिळतील. आय फोन एक्स हा लॉक होता जर तुम्हाला त्या बद्दल काही माहिती नसेल तर तो वापरणे अवघड आहे. जर कोणाला तो मिळाल तरी तो त्याला वापरू शकत नाही.”- पर्यटक कॉलिन ग्रॉडी, पर्यटक

- Advertisement -

लोकांनीही केल्या टीका

कॉलिनने भारताबद्दल लिहिल्यामुळे अनेकांना तिच्यावर टीका केली. तिने पोस्ट केल्याच्या काही तासांनंंतर पोलिसांकडून तिचा फोन परत करण्यात आला. यानंतर आपण रागात लिहिलेल्या कमेंट बद्दल तिने माफी मागितली. अनेकदा लोकांना ओळखण्यास आपल्याकडून चुका होतात आणि रागात आपण खूप काही बोलून जातो त्यामुळे मी फक्त मागू शकते असा संदेश तिने ब्लॉगवर लिहिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -