घरताज्या घडामोडीTravel Ban : अमेरिकेची भारतातून येणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी, विद्यार्थ्यांना मात्र सूट

Travel Ban : अमेरिकेची भारतातून येणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी, विद्यार्थ्यांना मात्र सूट

Subscribe

भारतीय विद्यार्थी ज्यांना एफ-१ आणि एम-१ व्हिसा मिळाला आहे, त्यांना अमेरिकेतील आपले शिक्षण पुढे सुरु ठेवता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. भारतातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर, काही देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांवर बंदी घातली असून यात अमेरिकेचाही समावेश आहे. बायडेन सरकारने भारतातून येणाऱ्या हवाई वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, अमेरिकेच्या शाळा, महाविद्यालये आणि युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यासाठी पात्र भारतीय विद्यार्थ्यांना यातून सूट असल्याचे यूएस स्टेट डिपार्टमेंटकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे भारतातील इतर विद्यार्थी, पत्रकार आणि अशा व्यक्ती ज्या अमेरिकेत पायाभूत सुविधा पुरवाण्यासाठी मदत करतात, त्यांनाही अमेरिकेत प्रवेश मिळू शकणार आहे.

एक महिनाआधीच अमेरिकेत प्रवेश

भारतीय विद्यार्थी ज्यांना एफ-१ आणि एम-१ व्हिसा मिळाला आहे, त्यांना अमेरिकेतील आपले शिक्षण पुढे सुरु ठेवता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकेतील नव्या शैक्षणिक सत्राला १ ऑगस्ट २०२१ पासून सुरुवात होणार आहे. तसेच यानंतर सुरु होणाऱ्या सत्रासाठीही भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत प्रवेश दिला जाणार आहे. परंतु, या विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या केवळ एक महिनाआधीच अमेरिकेत प्रवेश दिला जाणार आहे. या विद्यार्थ्यांना अमेरिकन दूतावासाशी संपर्क करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

भारतातून येणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी

भारतामध्ये शुक्रवारी चार लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनाबाधित रुग्णांचा हा आकडा मागील काही दिवसांत सातत्याने वाढत असल्याने अमेरिकेने भारतातून येणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील आरोग्य परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अमेरिकेच्या लोकांचे हित आणि आरोग्य लक्षात घेऊन भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर आम्ही बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले होते.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -