घरताज्या घडामोडीचीननंतर अमेरिकेत एका व्यक्तीला H5 बर्ड फ्लूची लागण

चीननंतर अमेरिकेत एका व्यक्तीला H5 बर्ड फ्लूची लागण

Subscribe

अमेरिकेतही एका व्यक्तीला H5 बर्ड फ्लूची लागण झाल्याचे वैद्यकिय चाचणीतून समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी चीनमध्ये एका व्यक्तीला एवियन फ्लू म्हणजेच बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता अमेरिकेतही एका व्यक्तीला H5 बर्ड फ्लूची लागण झाल्याचे वैद्यकिय चाचणीतून समोर आले आहे. संबंधित व्यक्ती पोल्ट्री फार्ममध्ये काम करत असून H5N1 बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या पक्ष्यांना मारण्याचे काम करतो. त्यातूनच त्याला हा संसर्ग झाला असावा अशी शक्यता तज्त्र व्यक्त करत आहेत. दरम्यान , याप्रकरणी युएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंटेन्शन (Centers for Disease Control)सीडीसी ने खुलासा केला असून H5 बर्ड फ्लू विषाणूच्या विशिष्ट वेरियंटशी संबंधित असलेले हे दुसरे मानवी प्रकरण आहे. तर संयुक्त राज्य अमेरिकेतील हे पहीलेच प्रकरण असल्याचे म्हटले आहे.

तसेच सीडीसीने H5 बर्ड फ्लू चा संसर्ग मानवासाठी धोकादायक नसल्याचा दावा केला आहे. तसेच याचा संसर्ग पसरू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले आहे. एवियन फ्लूचा संसर्ग झालेल्या पोल्ट्री आणि जंगली पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्यांवरही लक्ष असल्याचे सीडीसीने सांगितले आहे.

- Advertisement -

एवियन फ्लू ला H5N1 फ्लू देखील बोलले जाते. सीडीसीने या आठवड्याच्या सुरुवातीला एका व्यक्तीच्या नाकातील द्रवाची चाचणी केली होती. त्यात इन्फ्लूएंजा ए (H5)विषाणू (A H5 आढळले. संबंधित व्यक्ती पोल्ट्री फार्ममध्ये काम करत असून गेले काही दिवस त्याला ताप थकवा जाणवत होता. पण तपासणीत त्याच्यात सौम्य लक्षणे आढळली आहेत. तसेच तो टेमीफ्लू गोळ्या घेत असून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -