घरताज्या घडामोडीCNG च्या दरात पुन्हा वाढ, आज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी

CNG च्या दरात पुन्हा वाढ, आज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी

Subscribe

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या निमित्ताने एकीकडे केंद्र विरूद्ध राज्य असा संघर्ष पेटलेला पहायला मिळत आहे. दुसरीकडे दिवसागणिक डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती या सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहचवणाऱ्याच आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. ग्राहकांना आता सीएनजीच्या वापरासाठी आज मध्यरात्रीपासून जास्त पैसे मोजावे लागणार आहे. सीएनजीच्या दरातही गेल्या काही महिन्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा प्रति किलो ४ रूपयांनी सीएनजी गॅस महागला आहे. याची अंमलबजावणी मुंबई आणि महानगरात मध्यरात्रीपासून होणार आहे.

महानगरने कॉम्प्रेस्ड नॅच्युरल गॅस (CNG) च्या किंमती प्रति किलो ४ रूपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या किंमती मुंबई आणि परिसरासाठी लागू असतील. २९ एप्रिलच्या मध्यरात्री पासूनच या नव्या किंमती अंमलात येतील. त्यामुळे सीएनजी साठी आता ७६ रूपये प्रति किलो असा दर ग्राहकांना मोजावा लागणार आहे. एमजीएलने पीएनजीच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही.

- Advertisement -

देशांतर्गत निर्मिती होणाऱ्या नॅच्युरल गॅसवर १०० टक्क्यांची वाढ भारत सरकारने १ एप्रिल २०२२ पासून केली आहे. सध्याची सीएनजीची होणारी वाढ ही सर्वोच्च अशा स्वरूपाची वाढ आहे. देशात सध्या नैसर्गिक वायुचा तुटवडा भासत आहे. त्याचा परिणाम हा सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या गॅसवरही होत आहे. परिणामी सीएनजीच्या दरात वाढ होण्यावरही परिणाम झाला आहे.

देशात दिवसागणिक पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ पाहता सीएनजीच्या दरात पेट्रोलच्या तुलनेत ५७ टक्के बचत तर डिझेलच्या तुलनेत २७ टक्के बचत ही सीएनजीच्या माध्यमातून होत असल्याचे महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -