घरदेश-विदेशआमिर खान पूर्ण करणार का आपलं वचन?

आमिर खान पूर्ण करणार का आपलं वचन?

Subscribe

जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकाल, तेव्हा मी नक्की पाकिस्तानात येऊन तुमच्यासोबत आनंद व्यक्त करेन आणि माझ्याबरोबर बऱ्याच भारतीयांनादेखील आणेन, आमिरनं दिलं होतं इमरान खानला वचन.

सरतेशेवटी पाकिस्तानच्या निवडणुकीत इमरान खानचा पक्ष पाकिस्तान तहरीक ए इन्साफ (पीटीआय)चा विजय झाला आहे. लवकरच इमरान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी येण्याची शक्यता आहे. याच उत्सवाचा फायदा उचलन सोशल मीडियावर अचानक आमिर खाननं ५ वर्षापूर्वी दिलेलं वचन व्हायरल होऊ लागलं आहे. इतकंच नाही तर, आमिरनं दिलेलं वचन पाकिस्तानी अभिनेता आणि गायक अली झाफरनं लक्षात आणून दिलं आहे. आमिर खानला त्यानं यामध्ये टॅग केलं आहे.

५ वर्षांपूर्वी आमिरनं दिलं होतं वचन

वास्तविक २०१२ मध्ये एका मीडिया कार्यक्रमादरम्यान आमिर खाननं इमरान खानला राजकारणात यश मिळाल्यास, पाकिस्तान येण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. ‘जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकाल, तेव्हा मी नक्की पाकिस्तानात येऊन तुमच्यासोबत आनंद व्यक्त करेन आणि माझ्याबरोबर बऱ्याच भारतीयांनादेखील आणेन,’ असं इमरान खानच्या विचारांनी प्रभावित झालेल्या आमिरनं यावेळी म्हटलं होतं. ‘तुमचा आदर्शवाद आणि पाकिस्तानासाठी बघण्यात आलेलं स्वप्नं मला खूपच भावलं. पाकिस्तानला असं सरकार मिळो जे त्यांच्या समस्या सोडवू शकेल, एक पक्ष पाकिस्तानात समृद्धी घेऊन येऊ शकेल. हे फक्त पाकिस्तानसाठीच नाही तर, सर्वांसाठीच भल्याचं असेल,’ असंही आमिर खाननं यावेळी इमरान खानला उद्देशून म्हटलं होतं.

- Advertisement -

पाकिस्तानात यायची हीच ती वेळ

आमिर खाननं दिलेलं वचन आता लोकांना लक्षात आहे. ‘अली तुमचे बॉलीवूडच्या स्टार्सशी चांगले संबंध आहेत. त्यामुळं इमरान खान निवडणूक जिंकले असून आमिर खाननं इथं येऊन यश साजरं करून आपलं वचन पूर्ण करावं हा संदेश आमिरपर्यंत पोहचवा. पाकिस्तान अतिशय मनापासून त्यांची वाट पाहत आहे.’ असं पाकिस्तानी ट्विटर युजर सैयद सैफ मन्सूरनं ट्विट करून अली जफरला म्हटलं. त्यावर रिट्विट करत अली जाफरनं ‘आमिर खान, मला वाटतं आता वेळ आली आहे,’ असं म्हटलं आहे. फक्त अलीच नाही, तर बऱ्याच युजर्सनंदेखील आमिर खानला आठवण करून दिली आहे. दरम्यान इमरान खान नुकतेच पाकिस्तानमधील निवडणुकांमध्ये जिंकले असून पंतप्रधान होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -