घरदेश-विदेश'केदारनाथ मंदिरा'चे दरवाजे भक्तांसाठी उघडले!

‘केदारनाथ मंदिरा’चे दरवाजे भक्तांसाठी उघडले!

Subscribe

बम बम भोलेचा जयघोष करत शिवभक्तांनी केदारनाथ मंदिरात प्रवेश केला. आज तब्बल ६ महिन्यांनंतर उत्तराखंडातील प्रसिद्ध देवस्थान केदारनाथ मंदिर हे भक्तांसाठी खुले झाले आहे.

बम बम भोलेचा जयघोष करत शिवभक्तांनी आज, गुरुवारी केदारनाथ मंदिरात प्रवेश केला. आज तब्बल ६ महिन्यांनंतर उत्तराखंडातील प्रसिद्ध देवस्थान केदारनाथ मंदिर हे भक्तांसाठी खुले झाले आहे. यावेळी केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी हजारो भक्‍तांनी दर्शनासाठी मंदिराबाहेर गर्दी केली होती. मंदिर खुले करण्याची प्रक्रिया पहाटे चार वाजता सुरू करण्यात आली. दखिण व्दारावरील केदारनाथाचे रावल भीमाशंकर लिंग, केदारनाथच्या पुजारी केदार लिंग वेदपाठियांनी मंदिराचे दरवाजे खोलण्याची परंपरा रितीरीवाजाप्रमाणे पार पाडली. दरम्‍यान, मंदिराचे दरवाजे खोलण्याची विधिवत पुजा झाल्‍यानंतर दक्षिण व्दारातून पुजार्‍यांसह बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे उपाध्यक्ष अशोक खत्री, जिल्‍हाधिकारी मंगेश घिल्‍डीयाल, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. डी. सिंह, कार्यकारी अधिकारी एन. पी. जमलोकी, सदस्‍य अरूण मैठाणी, श्रीनिवास पोस्‍ती, शिव सिंह रावत आदी लोकांनी यावेळी मंदिरात प्रवेश केला.

- Advertisement -

हजारो भाविक दर्शनासाठी 

मुख्य मंदिराच्या प्रवेश द्वारावर विधिवत पुजापाठ केल्‍यानंतर पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास मंदिर गाभाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले. या प्रसंगी सुबेदार शशिधर यांच्या नेतृत्‍वाखाली जम्‍मू काश्मीर लाइट इन्फ्रंट्री बँडच्या धुनमध्ये हर हर महादेवच्या गजरात केदानाथ मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी प्रवेश केला. तब्‍बल सहा महिन्यानंतर केदारनाथ मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खोलण्यात आल्‍याने भाविकांसोबतच अनेक प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांनीही दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. यावेळी मंदिराला फुलांच्या माळांनी सजवण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -