घरदेश-विदेशफॉर्मेल्डिहाइड आढळल्याने 'या' राज्यातही 'जॉन्सन अँन्ड जॉन्सन'वर बंदी

फॉर्मेल्डिहाइड आढळल्याने ‘या’ राज्यातही ‘जॉन्सन अँन्ड जॉन्सन’वर बंदी

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या बेबी शॅम्पूमध्ये हानिकारक रासायनिक तत्व फॉर्मेल्डिहाइड आढळल्यामुळे उत्तर प्रदेशात या उत्पादनावर बंदी आणण्यात आली आहे

लहान मुलांचे उत्पादनं तयार करणारी प्रसिद्ध कंपनी जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या बेबी शॅम्पूमध्ये बाळाच्या शरिरास हानिकारक असणाऱ्या उत्पादनात हानिकारक रसायनिक तत्व आढळल्याने आंध्रप्रदेश, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश, आसाम या राज्यांमधून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये घातक रसायनांचे प्रमाण आढळून आल्यानंतर दुकानं आणि गोदामांमधून शाम्पूचा साठा हटवण्याचे निर्देश राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने दिले होते. या पार्श्वभूमीवर या राज्यांमध्ये जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या बेबीच्या उत्पादनावर आणि साठ्यावर देशभरात बंदी आणली आहे.

फॉर्मेल्डिहाइडमुळे उत्तर प्रदेशात बंदी

या पाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या बेबी शॅम्पूमध्ये हानिकारक रासायनिक तत्व फॉर्मेल्डिहाइड आढळल्यामुळे उत्तर प्रदेशात या उत्पादनावर बंदी आणण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून बुधवारी लखनऊ येथील सेंट्रल स्टोअरवर छापा टाकून जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या सात उत्पादनाचे नमुनेही घेण्यात आल्याने उत्तर प्रदेशात जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या उत्पादनाची चौकशी सुरु आहे.

- Advertisement -

भारताने या उत्पदनावर बंदी घातली होती, परंतु काही राज्यात यांची अंमलबजावणी करण्यात होती. मात्र आता उत्तर प्रदेशात जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या बेबी शॅम्पूमध्ये हानिकारक रासायनिक तत्व फॉर्मेल्डिहाइड आढळल्यामुळे तेथे ही या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे.

१६ हजार ७०४ शॅम्पू पाकीटे जप्त

जयपूर येथे असणाऱ्या जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या बेबी उत्पादनाचे नमुने घेण्यात आले होते, त्यात हानिकारक असलेले रासायनिक तत्व फॉर्मेल्डिहाइड आढळून आले. जयपुरमध्ये असणारी ही फॅक्टरी लखनऊ येथील दुकानांमध्ये शॅम्पू पुरवते. लखनऊ येथे तपासाणीदरम्यान १०० मिलीलीटरचे १६ हजार ७०४ शॅम्पू पाकीटे जप्त केली असून त्यांच्या विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे.

- Advertisement -

काय आहे फॉर्मेल्डिहाइड?

फॉर्मेल्डिहाइडमुळे शरीरावर त्वचेशी निगडीत रोग होण्याची शक्यता असते. तसेच कॅन्सरचा धोकाही उद्भावण्याची शक्यता आहे. याचा वापर खाद्यामध्ये व शरीराची संबंधित उत्पादनावर करण्यासाठी बंदी आहे. शॅम्पूमध्ये हे मिसळल्यामुळे घाम येत नाही. शरीरावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो, असे एफएसडीएचे सहाय्यक आयुक्त रमाशंकर यांनी माहिती दिली.

एफएसडीएकडून बंदीचे आदेश

एफएसडीएकडून २९ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या उत्पादनावर बंदी आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ७ मे रोजी बंदी असलेली उत्पादने कंपनीला परत घेण्याचे आदेश दिलेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून सूचना करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -