घरमनोरंजन'केदारनाथ'ही अडकला मीम्समध्ये

‘केदारनाथ’ही अडकला मीम्समध्ये

Subscribe

मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'चे बरेच मीम्स आले होते. तर आता 'केदारनाथ'चं ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटातील एका सीनचे मीम्स समोर येत आहेत.

सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे हे खरं आहे. पण सर्वात जास्त सध्या चलती आहे ती म्हणजे मीम्सची. सध्या ‘हसनेवालो को हसने का या फिर हसाने के बहाना चाहिये’ अशी काहीशी स्थिती झाली आहे. याआधी मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’चे बरेच मीम्स आले होते. तर आता ‘केदारनाथ’चं ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटातील एका सीनचे मीम्स समोर येत आहेत. यामधील असा एक संवाद आहे, ज्याचे सध्या मीम्स बनत आहेत. दिग्दर्शक अभिषेक कपूरने सोमवारी ‘केदारनाथ’चा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर सारा आणि सुशांत व्यक्तिरिक्त अन्य कोणाचा संवाद इतका प्रसिद्ध होऊन त्याचे मीम्स बनतील असा विचारही कोणाच्या मनात आला नसेल.

कोणत्या संवादाचे होत आहेत मीम्स?

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वडिलांची भूमिका साकारत असलेल्या नितीश भारद्वाजच्या तोंडी एक संवाद आहे, ‘नही होगा ये संगम, फिर चाहे प्रलय ही क्यों न आ जाए’. या संवादाचे अतिशय मजेशीर मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बरेच युजर्स आपापल्या पद्धतीने या संवादाशी कनेक्ट करत आहेत. या चित्रपटातून सारा अली खान पदार्पण करत आहे. या चित्रपटाची कथा ही २०१३ मध्ये केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयादरम्याची ही प्रेमकथा आहे.

- Advertisement -

- Advertisement -

वादाच्या भोवऱ्यात चित्रपट

‘केदारनाथ’ या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही संघटनांनी याला विरोध दर्शवला आहे. हिंदू – मुस्लीम कथा असल्यामुळे लव्ह – जिहादला यामधून प्रेरणा मिळण्याची शक्यता असल्याचं काही संघटनांचं म्हणणं आहे. मात्र या चित्रपटाकडे केवळ चित्रपट म्हणून पाहण्यात यावं असंही निर्माते आणि दिग्दर्शकांकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -