Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिनविरोधात बंड करणाऱ्या वॅगनर प्रमुखाचा विमान अपघातात मृत्यू

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिनविरोधात बंड करणाऱ्या वॅगनर प्रमुखाचा विमान अपघातात मृत्यू

Subscribe

रशियाची राजधानी मॉस्कोच्या उत्तरेला खासगी विमान कोसळून झालेल्या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा देखील विमान अपघातात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोच्या उत्तरेला काल (ता. 23 ऑगस्ट) खासगी विमान कोसळून झालेल्या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा देखील विमान अपघातात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातग्रस्त विमानात वॅगनरचे प्रमुख होते, असा रशियन एव्हिएशन एजन्सीने दावा केला आहे. एजन्सीने सांगितले की, वॅग्नर-चीफ प्रिगोझिन हे अपघात झालेल्या विमानात होते आणि अपघातात एकही प्रवासी वाचला नाही. म्हणजेच या अपघातात वॅगनर प्रमुखाचा मृत्यू झाला आहे. (Wagner chief, who rebelled against Russian President Putin, died in a plane crash)

हेही वाचा – Chandrayaan-3 नंतर आता इस्रोची ‘आदित्य एल-1’ मोहीम, सूर्याचा करणार अभ्यास

- Advertisement -

अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांच्या यादीत वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांचे नावही समाविष्ट असल्याचा दावा यापूर्वीच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मॉस्कोहून सेंट पीटर्सबर्गला जाणाऱ्या या विमानात सात प्रवासी आणि तीन क्रू मेंबर्स होते, असे रशियातील प्रसार माध्यमांकडून देण्यात आलेल्या अहवालात सांगण्यात आले आहे. मॉस्कोच्या उत्तरेला टवेर भागात हे विमान कोसळले. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये जेट क्रॅश झाल्याचे दाखवण्यात आले आहे, परंतु त्यात किती तथ्य आहे हे सांगणे कठीण असल्याचेही बोलले जात आहे.

रशियाची सरकारी वृत्तसंस्था ‘तास’ने अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले की, विमानात तीन पायलट आणि सात प्रवासी होते. अपघाताचा तपास करण्यात येत आहे. तर, सोशल मीडिया टेलिग्रामवर या सोशल मीडियावरून दावा केला जात आहे की हे विमान रशियातील हवाई संरक्षण दलाकडून पाडण्यात आले आहे.

- Advertisement -

वॅगनर ही खासगी सेना असून या सेनेचे नेतृत्व येवगेनी प्रिगोझिन करत होते. येवगेनी प्रिगोझिन यांनी जूनमध्ये राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात बंड केले आणि आपल्या सैन्यासह मॉस्कोवर हल्ला केला, परंतु बेलारूसने हस्तक्षेप केल्यानंतर ते मागे हटले. याआधी, येवगेनी प्रिगोझिनचे खाजगी लष्करी दल वॅगनर हे युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियन सैन्यासोबत लढले होते. त्यामुळे या विमान अपघातानंतर वॅगनर सेनेचे प्रमुख असलेल्या येवगेनी प्रिगोझिन यांचा मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पुतिनविरोधात बंड केल्यानेच राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी प्रिगोझिन यांचा अशा पद्धतीने काटा काढल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -