घरदेश-विदेशVideo: आणि इस्रोच्या प्रमुखांना अश्रू अनावर झाले

Video: आणि इस्रोच्या प्रमुखांना अश्रू अनावर झाले

Subscribe

चांद्रयान २ मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात लँडर चंद्रावर उतरवण्यात अपयश आल्यानंतर इस्रोचे वैज्ञानिक हताश झाले होते. वैज्ञानिकांचे मनोबल उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या कंट्रोल सेंटरमधून वैज्ञानिक आणि भारतीय जनतेसोबत संवाद साधला. भाषण संपवून मोदींनी सर्व वैज्ञानिकांसोबत हस्तांदोलन करत त्यांचा निरोप घेतला. मात्र इस्रोचे प्रमुख के. सिवन यांना आपल्या भावना अनावर झाल्या आणि त्यांनी मोदींनी मिठी मारत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -