घरदेश-विदेशWest Bengal : बंगालमध्ये मणिपूरची पुनरावृत्ती! महिला उमेदवाराची विवस्त्र धिंड; टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर...

West Bengal : बंगालमध्ये मणिपूरची पुनरावृत्ती! महिला उमेदवाराची विवस्त्र धिंड; टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर आरोप

Subscribe

West Bengal : मणिपूरमधील (Manipur) दोन नग्न महिलांची धिंड काढतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशामध्ये संतापाची लाट पसरलेली असतानाच आता पश्चिम बंगालमध्येही (West Bengal) तशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्रामपंचायतीच्या एका महिला उमेदवाराने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यकर्त्यांवर विनयभंग आणि शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. 8 जुलै 2023 रोजी पश्चिम बंगालमध्ये पार पडलेल्या पंचायत निवडणुकांच्या दिवशी ही लाजीरवाणी घटना घडली आहे. महिला उमेदवाराने आरोप केला आहे की, तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तिला विवस्त्र करून संपूर्ण गावात तिची धिंड काढली. ही घटना हावडा (Howrah) जिल्ह्यातील पांचला भागातील असून याप्रकरणी पाचला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (West Bengal Repetition of Manipur in Bengal! Dress Code of Female Candidate Allegation against TMC workers)

हेही वाचा – धक्कादायक : मणिपूरमधील ‘त्या’ दोन महिलांपैकी एकीचा पती कारगिल युद्धातील वीर जवान!

- Advertisement -

तृणमूलच्या सुमारे 40-50 कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तिने असेही सांगितले की, कार्यकर्त्यांनी माझ्या छातीवर आणि डोक्यावर काठीने वार करून मला मतदान केंद्राबाहेर फेकून दिले. त्यांनी माझे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला आणि मला नग्न होण्यास भाग पाडले. सर्वांसमोर माझा विनयभंग केला. मला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. महिलेने दाखल केलेल्या एफआयआरच्या प्रतीमध्ये तृणमूलचे उमेदवार हेमंत राय, नूर आलम, अल्फी एसके, रणबीर पंजा संजू, सुकमल पंजा यांच्यासह अनेकांची नावे आहेत.

- Advertisement -

ही घटना समोर आल्यानंतर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख आणि पश्चिम बंगाल भाजपचे सहप्रभारी अमित मालवीय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, ममता बॅनर्जींना लाज वाटते का? आपल्या राज्य सचिवालयापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. तुम्ही अयशस्वी मुख्यमंत्री आहात आणि तुम्ही तुमच्या बंगालवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

हेही वाचा – Parliament : मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक, लोकसभा सोमवारपर्यंत स्थगित

दरम्यान, मणिपूरमधील घटना समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींपर्यंत सर्वांनी तीव्र निषेध केला होता. हे मानवतेविरुद्धचे घृणास्पद कृत्य असल्याचे म्हटले होते. या घटनेबाबत ममता यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -