घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसिटी सेंटर मॉलमध्ये दहशतवादी घुसल्याने घबराट; मॉकड्रिलचा थरार

सिटी सेंटर मॉलमध्ये दहशतवादी घुसल्याने घबराट; मॉकड्रिलचा थरार

Subscribe

नाशिक : उंटवाडी पुलाजवळील सिटी सेंटर मॉलमध्ये गुरुवारी (दि.२०) दुपारी 12.30 वाजेदरम्यान बॉम्ब ठेवल्याचे पोलेस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला कॉलव्दारे सांगण्यात आले. त्यानंतर नियंत्रण कक्षातून तात्काळ शहर पोलीस यंत्रणेला सतर्कतेेचा इशारा देण्यात आला. बॉम्बची माहिती मिळताच गंगापूर, मुंबई नाका, सरकारवाडा, अंबड पोलीस ठाण्याच्या पथकांसह शहर गुन्हे शाखा, दहशतवादीविरोधी पथक, बीडीडीएसची पथकांनी सिटी सेंटर मॉलकडे धाव घेत अवघ्या दोन तासांत बॉम्ब निकामी केला. नाशिक शहर पोलिसांनी घेतलेल्या मॉक ड्रीलनिमित्त सोमवारी, १५ एप्रिलला नाशिककरांनी हा थरार अनुभवला.

कोणत्याही आपत्तीची शक्यता लक्षात घेऊन सराव करणे महत्त्वाचे असल्याने सोमवारी मॉक ड्रिल करण्यात आले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात गुरुवारी (दि.२०) दुपारी 12 वाजेदरम्यान कॉल आला आणि सिटी सेंटर मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा संदेश मिळाला. नियंत्रण कक्षातून तात्काळ शहर पोलीस यंत्रणेला सतर्कतेेचा इशारा देण्यात आला. बॉम्बची माहिती मिळताच पोलिसांनी सिटी सेंटर मॉलकडे धाव घेतली. तसेच, अग्निशमन दलाचे बंब, जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांसह रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.

- Advertisement -

सिटी सेंटर मॉल परिसरात मोठ्या संख्येने पोलीस आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांच्या शीघ्रकृतीदल पथकाने मॉलमधील नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढल्यानंतर बॉम्बचा शोध सुरू केला. त्यासाठी श्वानपथक पाचारण करण्यात आले. पार्किंगमधील एका वाहनात बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, बॉम्बशोधक व विनाशक पथकाने सदरचा बॉम्ब निकामी केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

मॉकड्रिलमध्ये सहभागी झालेले अधिकारी

मॉक ड्रीमध्ये गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, आनंदा वाघ, डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, सचिन बारी यांच्यासह गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सरकारवाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, मुंबई नाकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्यासह शीघ्रकृती दल, दहशतवाद विरोधी पथक, बीडीडीएस, अग्निशमन दल आणि जिल्हा रुग्णालयाचे पथकाने सहभाग घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -