घरदेश-विदेशपश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपची मागणी

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपची मागणी

Subscribe

पश्चिम बंगालमधील हिंसक परिस्थिती पाहता भाजपकडून जम्मू-काश्मीर प्रमाणेच राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरनंतर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये सुरु झालेला भाजप आणि टीएमसी पक्षातील वाद काही संपेना. या वादाने आता गंभीर रुप धारण केले आहे. पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंचारामुळे त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. त्याचसोबत गृहमंत्रायाकडून राज्य सरकारकडे अहवला मागवला आहे. हा अहवाल घेऊन राज्यपाल पंतप्रधानांच्या भेटीसाठी पोहचले आहेत.

- Advertisement -

काय घडले होते परगणामध्ये

पश्चिम बंगालच्या २४ उत्तर परगणा येथे पक्षांचे झेंडे लावण्यावरुन दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर भाजपच्या ३ कार्यकर्त्यांची हत्या झाली. या कार्यकर्त्यांच्या अंत्यसंस्कारावरुन भाजप आणि पश्चिम बंगाल पोलिसांमध्य वाद झाला. हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी बशीरहाट येथील पक्ष कार्यालयात घेऊन जाताना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यामध्येच या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली.

- Advertisement -

१२ तासांच्या बंदीची हाक

या घटनेच्या निषेधार्थ आणि पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात भाजपने बंदची हाक दिली आहे. भाजपने बशीरहाटसह संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये १२ तासांच्या बंदची हाक देण्यात आली. तसंच हा काळ भाजप काळा दिवस पाळणार असल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्ये आंदोलन करत आहेत. रास्तारोको, रेलरोको आंदोलन केले जात आहे. पश्चिम बंगालमधील दुकान, बाजारपेठा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी राज्यातील परिस्थिची तुलना काश्मीरशी केली आहे.

गृहखात्याने मागवला अहवाल

लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची परिस्थिती पाहता गृह मंत्रालयाने अहवाल मागवला आहे. अहवाल देण्यासाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी दिल्लीत पोहचले आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी आणि राज्यात सुरु असलेल्या हिंसाचाराचा अहवाल देण्यासाठी दिल्लीमध्ये पोहचले आहेत. पंतप्रधानासोबतच ते गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार आहेत.

गृहमंत्रालयाने बोलावली बैठक

गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्रालयाची मोठी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये जम्मू-काश्मीरसह अन्य राज्यातील सुरक्षेवर चर्चा केली जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. पश्चिम बंगालमध्ये वारंवार हिंसाचार होत आहे यावर देखील या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. बैठकीत अमित शहा यांच्याव्यतिरिक्त अजीत डोवाल, आयबी सचिवांसह अन्य प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

भाजप नेता कैलाश विजयवर्गीय यांनी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी असे म्हटले आहे की, जर पश्चिम बंगालमध्ये हिच परिस्थिती कायम राहिली तर केंद्राला हस्तक्षेप करावा लागेल. त्यासाठी कलम ३५६ लागू करण्याची मागणी केली जात आहे.

सत्ता काबिज करण्याची चाल

दरम्यान, तृणमूल काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सोमवारी पत्र पाठवून आरोप केले आहेत. गृहमंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारला पाठवलेला सल्ला हा विरोधीपक्ष शासित राज्यामध्ये षडयंत्र आणि सत्ता काबिज करण्याची चाल असल्याचे म्हटले आहे. टीएमसीचे महासचिव आणि पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चटर्जी यांनी हे पत्र गृहमंत्र्यांना पाठवले आहे. त्यानी पत्रात पुढे असे म्हटले आहे की, गृहमंत्र्यालयाने सत्य परिस्थिती जाणून न घेता राज्या सरकारकडून रिपोर्ट न घेता निष्कर्ष काढला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -