घरदेश-विदेशयुकेमधील कबुतरांना झालंय काय? झॉम्बीसारखी वागू लागल्याने नागरिकांमध्ये दहशत

युकेमधील कबुतरांना झालंय काय? झॉम्बीसारखी वागू लागल्याने नागरिकांमध्ये दहशत

Subscribe

युकेमधील कबुतरांना विचित्र आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. या विचित्र आजारामुळे कबुतरं झॉम्बीसारखी वागायला लागली आहेत. या कबुतरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कबुतरांवर न्युरॉलॉजिकल परिणामांमुळे म्हणजेच त्यांच्या मेंदूवर झालेल्या परिणामांमुळे ही कबुतरे अशी तडफडत आहेत. तसंच, त्यांची मान देखील वाकडी झाली आहे. त्यामळे ही कबुतरे उडूसुद्धा शकत नाहीत. या विशिष्ट आजारालान्यूकॅसल डिसीज म्हणतात.

या आजारी असलेल्या कबुतरांची विष्ठा हिरव्या रंगाची असते. loftyhopespigeonpositive या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका कबुतराचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये मान वाकडी केलेला कबुतर आहे.

- Advertisement -

दरम्यान,  याआधीच इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस (IFS) चे अधिकारी डॉक्टर सम्राट गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार,  हा कीटक चालण्यास सक्षम नव्हता. कारण या कीटकाच्या मेंदूवर नव्या विषाणूची लागण झाली होती. हा विषाणू कीटकाच्या मेंदूवरर ताबा मिळवतो. त्यामुळे कबुतरांना त्याला चालण्या फिरण्यास अडचणी येतात. म्हणजेच ते एखाद्या झॉम्बीप्रमाणे वागतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -