घरदेश-विदेशविप्रोचे प्रमुख अझीम प्रेमजी झाले निवृत्त

विप्रोचे प्रमुख अझीम प्रेमजी झाले निवृत्त

Subscribe

विप्रो चेअरपर्सन अझीम प्रेमजी मंगळवारी कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून निवृत्त झाले आहेत. गेली 53 वर्षे कंपनीच्या प्रमुखाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. या पदावर त्यांचे पुत्र रिषद प्रेमजी यांची नियुक्ती झाली आहे.

वयाच्या 21 व्या वर्षी वडील मोहम्मद हाशिम प्रेमजी यांची कुकिंग ऑईल कंपनी वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स लिमिटेड (WIPRO) चा कारभार सांभाळणारे प्रेमजी आज देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे आणि Wipro या देशाची सर्वात चार मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे.

- Advertisement -

प्रेमजी यांचं कुटुंब मूळ रुपाने बर्मा (म्यानमार) येथील असून त्यांचे वडील मोहम्मद हाशिम बर्माचे राईस किंग म्हणून ओळखले जात होते. काही अज्ञात कारणांमुळे त्यांचं कुटुंब 1930-40 च्या दशकात भारताच्या गुजरातच्या कच्छ येथे आले असून तेथे देखील त्यांनी तांदळाचा व्यवसाय सुरू केला. त्यात यश मिळालं आणि कालांतराने हाशिम यांनी आपला व्यवसाय तांदूळ ते वनस्पती तुपाकडे वळवले आणि 1945 मध्ये त्यांनी वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स लिमिटेडचे गठन केले.

वडील मोहम्मद हाशिम यांच्या मृत्यूनंतर वयाच्या 21 व्या वर्षात अझीम प्रेमजी यांना अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील अभ्यास सोडून भारतात यावे लागले आणि वडिलांच्या कंपनीची धुरा सांभाळावी लागली. तेव्हा पर्यंत तरुण अझीम यांना व्यवसायाचा काही अनुभव नव्हता. वेळेसोबत त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आणि विप्रोला एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये परिवर्तित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -